शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
2
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
3
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
4
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
5
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
6
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
7
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
8
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
9
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
10
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
11
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
12
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
13
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
14
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
15
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
16
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
17
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
18
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
19
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
20
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक

‘महाराष्ट्र को क्या मिला; मुख्यमंत्री साहेब, जरा सिरियस व्हा...! सुप्रिया सुळे यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 6:12 PM

केवळ हारतुरे स्वीकारणे, खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते.

पुणे : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे राज्यातील सुमारे अडीच ते तीन लाख तरुणांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तळेगाव येथील जागा वेदांता कंपनीने निश्चित केली होती. ती कशामुळे गेली याचे उत्तर राज्यातील सत्ताधाऱ्यांना द्यावे लागेल. केवळ खुर्चीमध्ये बसणे आणि हार-तुरे स्विकारणे म्हणजे सर्व काही मिळविले असे नसते तर त्या पदाची जबाबदारी देखील घ्यावी लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता सिरियस होण्याची गरज आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावले.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी वेदांता-फॉक्सकॉन कंपनी राज्याबाहेर गेल्याचा निषेध बालगंधर्व येथे आंदोलन करून नोंदविण्यात आला. यावेळी ‘महाराष्ट्र को क्या मिला, लॉलीपॉप लॉलीपॉप’ अशा जोरदार घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टिकेची तोफ डागली. त्या म्हणाल्या की,  वेदांता व फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही तुम्हाला याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ अशा प्रकारचे लॉलीपॉप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. केंद्र आणि राज्य सरकार केवळ जनतेस लॉलीपॉप दाखवत असून कोणत्याही आश्वासनाची पूर्तता करण्यात येत नाही. लहान मुलांना ज्या प्रकारे समजूत काढण्यासाठी आश्वासन दिले जाते तसेच लॉलीपॉप सरकार जनतेस देत आहे. राज्याच्या हितासाठी सरकारने काम करणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारमध्ये गुजरातमधील वजनदार नेते असून आगामी गुजरात विधानसभा निवणुकीपूर्वी मताचा जोगवा पदरात पाडून घेण्यासाठी वेदांता प्रकल्प हलविण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस