पुणे : आजपर्यंत आपण कावळा हा काळा रंगाचा पाहिला असेल. मात्र आता पुण्यातील लुल्ला नगर परिसरामध्ये पांढरा कावळा पाहायला मिळाला. एकूणच पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. काळ्या कावळ्यांच्या समूहामध्ये अशा प्रकारचा पांढरा कावळा दिसल्यावर साहजिकच आश्चर्य वाटण्यासारखी बाब आहे.
याआधीही दोन वर्षांपूर्वी शिरूर भागामध्ये अशा प्रकारचा कावळा लोकांच्या दृष्टीस पडला होता. पांढरा कावळा पाहिल्यानंतर परिसरातील नागरिक या कावळ्याचे छायाचित्र घेत आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार अशा प्रकारचा कावळा हा दहा हजार कावळ्यांमधून एखादा सापडतो. जनुकीय विकारामुळे कावळ्यांमध्ये अल्बिनिझम किंवा ल्यूसिझम म्हणजे पंखांमध्ये रंगद्रव्य साठवण्याची कमतरता कमी असल्याने हा प्रकार आढळतो.
"पांढरा कावळा" म्हणजे काय?
पांढरा कावळा एक अतिशय दुर्मिळ पक्षी आहे. पांढरा कावळा हा शब्द दोन अर्थांमध्ये वापरला जातो. निसर्गाच्या जगात - एक अलब्विइन कावळा अलबिनिझम एक विसंगती आहे. कावळ्यांचा रंग बदलण्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. पांढरा कावळा देखील इतर काळ्या कावळ्यांप्रमाणेच आहे परंतु अनुवंशिक दोष ल्यूसिझममुळे काही कावळे पांढरे होतात. जगात कावळ्यांच्या अशा अनेक प्रजाती आहेत, जिथे शरीरावर कुठेतरी पांढरा डाग आहे.