पुणे : राज्य सरकारने सव्वादोनशे जणांच्या उपस्थितीत पुणे महापालिका सर्वसाधारण सभा घेऊन शकते़ असे स्पष्ट आदेश दिले असताना सुध्दा सत्ताधारी पक्षाने ते पायमल्ली तुडविले आहेत़ सत्ताधारी पक्ष आॅनलाईन सभा घेऊन पुणेकरांपासून काय लपवत आहे, यामागे काय गौडबंगाल आहे़ असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी पत्रकारांशी बोलताना केला़
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे असलेल्या सभागृृहात आज महापौर बसत नाहीत, त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे़ असे सांगून तुपे यांनी यावेळी कोरोना आपत्तीचा गैरफायदा घेऊन अनेक गोष्टींवर पडदा टाकण्याचा सत्ताधाºयांचा डाव असल्याचा आरोप केला़ महापौर दरवाजा बंद करून आॅनलाईन सभा घेत आहे हा प्रकार लोकशाहीची थट्टा करणारा असून, आम्ही सर्व विरोधी पक्ष या गोष्टीचा निषेध करीत असल्याचे ते म्हणाले़
राज्य शासनाने सभागृहात सभा घेण्याचे आदेश दिले असताना सुध्दा सत्ताधाºयांनी आमची मागणी धुडकावून लावली असून, त्यांनी राज्य शासनाच्या आदेशाचा अपमान केला असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला़ काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी, आॅनलाईन सभा घेऊन लाखो रूपयांचा चुराडा करण्याचे काम सत्ताधारी पक्षाने केले असल्याचा आरोप यावेळी केला़ तर सभागृहाचे कामकाज सुरळीत व्हावे व पुणेकरांचे प्रश्न सोडाविण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण सत्ताधारी पक्ष मनमानी कारभार करून सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला़
------------------------------