शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील 'त्या' अपघाताआधी काय काय घडलं? CCTV कॅमेऱ्यात सगळं कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 8:05 PM

बिल्डरच्या या पोराचे प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत...

- किरण शिंदे

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अगरवाल यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारण काय तर त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला परवाना नसतानाही आलिशान पोर्शे कार चालवायला दिली. या अल्पवयीन मुलाने ही कार दारूच्या नशेत चालवून दोघांचा जीव घेतला आहे. या अपघाताप्रकरणी बिल्डरच्या या पोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला कोर्टातही हजर करण्यात आले. मात्र कोर्टाने अवघ्या काही तासांत त्याची जामिनावर सुटका केली. मात्र याआधी नेमकं काय काय घडलं? बिल्डरच्या या पोराचे प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत.

तर नुकताच बारावी पास झालेला बिल्डरचा हा अल्पवयीन पोरगा दहा ते बारा मित्रांसोबत पार्टीसाठी आला होता. मुढव्यातील कोझी हॉटेलमध्ये त्यांनी 15 क्रमांकाचा टेबल बुक केला होता. शनिवारी रात्री साडेनऊ ते १२ या वेळेत ते या हॉटेलमध्ये थांबले होते. या हॉटेलमध्ये त्यांनी जेवणासोबत काही मद्य देखील ऑर्डर केले होते. जेवण आणि मध्ये पिऊन झाल्यानंतर हे सर्व मित्र पुढील पार्टीसाठी मुंढव्यातील हॉटेल ब्लॅक या ठिकाणी गेले होते. रात्री बारा ते एक या कालावधीत हे सर्व हॉटेल ब्लॅक या ठिकाणी होते. तेथेही त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर मात्र बिल्डरचा हा पोरगा दोन मित्रांसह आलिशान पोर्शे कार घेऊन निघाला. दारूच्या नशेत बेधुंद झालेल्या या तरुणाच्या हातात होती आलिशान अशी पोर्शे कार. सुसाट वेगाने ही कार घेऊन तो कोरेगाव पार्कच्या रस्त्याने निघाला होता. मात्र दारूच्या नशेत असलेल्या या तरुणाला गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवणे जमले नाही आणि पुढे होत्याचे नव्हते झाले.

भरधाव वेगातील आलिशान पोर्शे कार अनिश अवधीया या तरुणाच्या दुचाकीला जाऊन धडकली. दुचाकीवर पाठीमागे बसलेली अश्विनी कोष्टा हवेत उडाली आणि जमिनीवर आदळली. तर अनिश पुढे जाऊन एका चारचाकी कारवर आदळला. गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही यात मृत्यू झाला. मात्र गंभीर घटनेनंतरही आरोपीला काही तासातच जामीन मिळाल्याने संताप व्यक्त केला जाऊ लागला. यानंतर मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला मद्य विकणाऱ्या हॉटेल चालक आणि अल्पवयीन असतानाही चारचाकी चालविण्यास देणाऱ्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण घटनेचे पडसाद आज दिवसभर पुणे शहरात राहिले. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल्स आणि पब यांच्या तक्रारी देखील पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्या. पुणेकर नागरिकांचा वाढता संताप पाहता पोलीस आयुक्तांनीही यापुढे आणखी कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी केली जाईल असा विश्वासही पुणेकरांना दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातsunil tingreसुनील टिंगरे