पुणे : लाडक्या बाप्पाचे आगमन (दि.१९) रोजी होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. म्हणून यावर्षी (दि.१९) सप्टेंबर रोजी भद्रा व वैधृति योग असला तरीही नेहमीप्रमाणे ब्राह्म मुहूर्त म्हणजेच पहाटे ४:५० पासून दुपारी १:५० यावेळेत आपल्या घरात गणेशाची प्राणप्रतिष्ठाना करावी, असे दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले आहे.
यंदाचे गणेशोत्सवातील महत्वाचे दिवस :
मंगळवार, १९ सप्टेंबर : श्रीगणेश चतुर्थी पहाटे ४:५० पासून दुपारी १:५० पर्यंत गणेशाची स्थापना करता येईल.
गुरुवार, २१ सप्टेंबर : गौरी आवाहन सूर्योद्यापासून दुपारी ३:३५ पर्यंत अनुराधा नक्षत्रावर आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.
शुक्रवार, २२ सप्टेंबर : गौरी पूजन
शनिवार, २३ सप्टेंबर : गौरी विसर्जन सूर्योदयापासून दुपारी २.५६ पर्यंत मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करावे.