शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

एकतर्फी प्रेम कसले ‘पटवायचे’ म्हणून लागतात मागे; टवाळखोरांकडून शाळकरी मुलींचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 5:14 PM

मुलींना ‘पटवायचे’ म्हणून मागे लागणाऱ्या टवाळखोरांचा छळ अनेक मुलींना सहन करावा लागत आहे

तन्मय ठोंबरे

पुणे : ‘एकतर्फी प्रेम’ म्हणणे म्हणजे खूप सुसंस्कृतता, मुलींना ‘पटवायचे’ म्हणून मागे लागणाऱ्या टवाळखोरांचा छळ अनेक मुलींना सहन करावा लागत आहे. आत्तापर्यंत हा त्रास केवळ शाळेच्या परिसरात होता. परंतु, सगळ्यांच्याच हातात मोबाईल आल्यामुळे आता घरापर्यंत आला आहे.  मुलीच्या वर्गातीलच मुलाकडून तिचा मोबाईल नंबर मिळवून फोनवर त्रास देण्याचे प्रमाणही वाढले आहे.

शाळेत जाऊन एका मुलीवर चाकूहल्याचा प्रकार नुकताच घडला. या पार्श्वभूमीवर शाळांच्या परिसरातील तसेच काही मुलींशी संवाद साधला. शाळेच्या आवारात  काही टवाळखोर मुले बसलेले असतात. शाळेतील एखाद्या विद्यार्थ्यांशी मैत्री करतात. त्याच्याकडून ठराविक मुलीची माहिती काढून घेतात. त्यापैकी एखादी मुलगी या विद्यार्थ्याच्या परिचयाची आहे का, हे पहिले जाते. त्यानंतर हे टवाळखोर त्या मुलीची छेड काढण्यास सुुरुवात करतात आणि पाठलागही करतात. मुली बसस्टॉपवर थांबल्यावर त्यांच्यासमोर जाऊन गाणे वाजवणे, गाड्यांचे हॉर्न वाजवणे असे प्रकार केले जातात. हे सर्व पाहून मुलगी घाबरून शेवटी निघून जाते, असे आसपासच्या लोकांनी सांगितले.  

तुम्हीपैसे नका देऊ, आम्ही देतो

- टवाळखोर मुलं वर्गातील मुलांना दमदाटी करून त्यांच्याकडून आमचे नंबर मिळवतात. त्यानंतर आम्हाला वारंवार फोन करून त्रास देतात. अनेकदा आम्ही आई  किंवा बाबांचा नंबर शाळेच्या स्टुडंट डायरीत देतो. त्यावेळी त्या नंबरवर फोन केला जातो. त्यानंतर कुटुंबाकडून याबाबत आमची चौकशी होते.

- शाळेच्या आवारात असणाऱ्या गोळा विक्रेत्याने सांगितले की,  मुली जेव्हा माझ्याकडे गोळा घेण्यासाठी येतात तेव्हा समोर असणारी काही मुले लांबूनच आवाज देत, ‘’तुम्ही पैसे नका देऊ, आम्हीच देतो’’ असे म्हणतात. त्यावेळी मुली घाबरून गोळा न घेता पटकन निघून जातात

मुलींसाठी तोंड दाबून बुक्क्याचा मार

ऑनलाइन शिक्षणामुळे आता विद्यार्थ्यांकडेही स्वत:चे मोबाईल आहेत. मुलींचा स्वत:चा मोबाईल असेल तर अनेकदा सतत फोन येत राहतात. त्यामुळे या मुलींचा मानसिक कोंडमारा होताे. घरच्यांकडूनही तुझा मोबाईल नंबर त्याच्याकडे गेलाच कसा, असेही विचारले जाते.

टॅग्स :SchoolशाळाPoliceपोलिसEducationशिक्षणTeacherशिक्षकWomenमहिला