पुणे : पुण्यातील प्रभात रस्त्यावर एका भिंतीवर रिड मी इन फाईव्ह डी झाेन असे वाक्य लाल अक्षरात लिहिण्यात अाले अाहे. हेच वाक्य पुण्यातील आणखी दाेन ठिकाणी लिहील्याचे अाढळून अाले अाहे. नेमके हे वाक्य अाहे तरी काय ?, अाणि याचा अर्थ काय अाहे ? असे प्रश्न अाता पुणेकरांना पडले अाहेत. पुण्यातील फ्लेमिंगाे या नाट्यसंस्थेच्या एका नाटकाचे नाव या सारखेच अाहे, परंतु त्यांच्या संस्थेने हे वाक्य भिंतींवर लिहीले नसल्याचे या संस्थेचा अक्षय मांडे याने लाेकमतशी बाेलताना स्पष्ट केले. पुण्यातील प्रभात रस्त्यावर माेठ्याप्रमाणावर वाहतूक असते. त्यातच पुणे शहरातील महत्त्वाचा असा एक हा रस्ता अाहे. या रस्त्यावरील एका इमारतीच्या संरक्षत भिंतीवर बाहेरच्या बाजूने वरील वाक्य इंग्रजीत लिहिण्यात अाले अाहे. हेच वाक्य प्रभात रस्त्यावरील एका गल्लीमध्ये व सेनापती बापट रस्त्यावर एका ठिकाणी सुद्धा लिहीले असल्याचे अाढळले अाहे. नेमके हे वाक्य काेणी अाणि कश्यासाठी लिहीले अाहे याबाबत एकप्रकारे गूढ निर्माण झाले अाहे. अक्षय मांडे यांच्या संस्थेच्या एका नाटकाचे नाव असेच असल्याने त्याला याबाबत विचारणा केली असता, त्यांनाही हे काेणी लिहीले याबाबत कुठलिही माहिती नाही. तसेच त्यांच्या नाटकाशी सारखं असलेलं वाक्य काेणी लिहंलं असेल याचाही शाेध घेण्याचा प्रयत्न त्यांचा सर्व ग्रुप घेत अाहे. अक्षय म्हणाला, अाम्हालाही हे वाक्य दाेन तीन ठिकाणी लिहीलेले अाढळले. अामच्या संस्थेच्या काेणी हे वाक्य नाटकाला प्रसिद्धी मिळावी किंवा इतर कुठल्याच कारणासाठी लिहीलेले नाही. अामच्या नाटकाला याअाधीच अनेकदा प्रसिद्धी मिळाली अाहे, त्यामुळे प्रसिद्धीसाठी असे कृत्य काेणीही करणार नाही. हे वाक्य कशासाठी लिहीण्यात अाले असेल याबाबत अाम्हीसुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करत अाहाेत.
रिड मी इन फाईव्ह डी झाेनचा अर्थ नेमका अाहे तरी काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 5:24 PM