पुणे : ‘सिनेमाची तिकिटे, क्रिकेट सामना, हॉॅटेल यांसाठी रांगेत उभे राहायला आपली हरकत नसते. मात्र, राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभे राहण्याबाबत का आक्षेप नोंदवला जातो ,’ असा सवाल करत, ‘आपण आई-वडील, शिक्षकांप्रती आदर दाखवतो, तोच देशाप्रती असायला हवा. ५२ सेकंदांत आपल्यातील माणूस आणि संस्कारांचे दर्शन घडते,’ असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते आणि एफटीआयआयचे चेअरमन अनुपम खेर यांनी व्यक्त केले.‘मुक्तछंद’ या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणा-या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘स्व. प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि ‘तीन तलाक’साठी यशस्वी लढा देणाºया शायरा बानो यांना प्रदान करण्यात आला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे वितरण करण्यात आले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी खासदार पूनम महाजन, महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. नाहीद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.खेर म्हणाले, ‘चाहत्यांकडून मिळणारी दाद माझ्यातील अभिनेत्याला नव्हे, तर भारतीयाला असते. भारतीय म्हणून देशाविषयी बोलण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे, मी कायम बोलत राहीन.’शायरा बानो म्हणाल्या, ‘महिला कुटुंब, समाज आणि राष्ट्रनिर्माणात मोलाची भूमिका बजावतात. त्यांच्या मूल्यांचे हनन होऊ नये, यासाठी नवनिर्मित समाजाची गरज आहे. यापुढील आयुष्यही समाजाच्या विकासासाठी समर्पित करण्याचा मानस आहे.’कार्यक्रमाच्या आयोजक मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘आकाशाकडे झेपावण्याचे क्षण निर्माण करणाºया मोजक्याच व्यक्ती आजूबाजूला पाहायला मिळतात. अशी असामान्य आणि प्रभावशील माणसे सामान्यांना आयुष्यात प्रेरणा देत असतात. त्यांचा वारसा आपण चालवला पाहिजे आणि असामान्य कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे.’ राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.प्रकाश जावडेकर म्हणाले, की अनुपम खेर, शायरा बानो यांच्या रुपाने देशाला महान रत्ने लाभली आहेत. आजकाल राष्ट्रभक्तीबाबत बोलणाºयांना प्रतिगामी, तर इतरांना पुरोगामी म्हणण्याची नवी व्याख्या अस्तित्वात आली आहे. खेर यांनी ही भाषा मोडीत काढली. बानो यांनी महिलांच्या हक्कासाठी दिलेला लढा कौैतुकास्पद आहे. सभ्य समाजाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी स्त्री-पुरुष समानता रुजायला हवी.गिरीश बापट म्हणाले, प्रमोद महाजन हे राजकारणातील बापमाणूस होते. केवळ वक्तृत्वात नव्हे, तर कर्तृत्वातही आघाडीवर होते. राजकारणात काम करणाºया प्रत्येकाने त्यांचा आदर्श डोळ््यांसमोर ठेवायला हवा. त्यांच्या नावाचा पुरस्कारही अत्यंत योग्य व्यक्तीला मिळाला. सध्या एफटीआयआयमध्ये खूप काम करण्याची गरज आहे. त्यामुळे अनुपम खेर यांची निवड अत्यंत योग्य आहे. पालकमंत्री म्हणून संस्थेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा माझा प्रयत्न असेल.पूनम महाजन म्हणाल्या, मी केवळ नावाने ‘महाजन’ आहे. मात्र, प्रमोद महाजन यांचा वारसा मेधा कुलकर्णी खºया अर्थाने पुढे नेत आहेत. आजकाल असहिष्णुतेच्या नावाखाली कला, साहित्याची वर्गवारी केली जाते. राजकारणाच्या नावाखाली वाटल्या गेलेल्या लोकांना अनुपम खेर यांच्यामुळे कला, संस्कृती, साहित्याचे महत्त्व समजेल. शायरा बानो यांनी महिला आणि माणुसकीसाठी काम केले आहे.
राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभे राहण्याबाबत आक्षेप का? अनुपम खेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 7:15 AM