पुणे - राज्याची शैक्षणिक आणि सांस्कतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहराच्या शेकडो खुना आहेत. मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराचं औद्योगिकरण झालंय. आयटी कंपन्यांपासून ते औद्योगिकरणापर्यंत, रस्त्यावरील फेरीवाल्यापासून ते उंचंच उंच टॉवर आणि मॉलपर्यंत पुण्याचा विस्तार झालाय. देशातील नावाजलेल्या महानगरांपैकी पुणे एक आहे. त्यामुळेच, पुणे शहराची ओळख दूरवरुनही सहजच करता येईल.
पुण्यातील मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पुण्यातला एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, झाडांच्या आड लपलेली पुणे शहरातील एक महत्त्वाची वास्तू दिसते आहे, ही वास्तू कुठली? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
पुणे विद्यापीठपुणे विद्यापीठ हे पुण्यातील आणि महाराष्ट्रातील शिक्षण पंढरी म्हणूनच ओळखलं जातं. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं ते हक्काच आणि अभिमानाचं स्थान आहे. त्यामुळे, पुणे विद्यापीठ छायाचित्रातूनही लक्षात येतं. ऐतिहासिक इमारत आणि नावाजलेलं, चर्चेतलं विद्यापीठ म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ होय. तर, आगा खान पॅलेस हेही पुण्यातील ऐतिहासिक वास्तू आहे.
आगा खान पॅलेससुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरा यांनी हा पॅलेस बांधला होता. आगा खान पॅलेस ही एक भव्य इमारत आहे. महात्मा गांधी, त्यांची पत्नी कस्तूरबा गांधी, त्यांची सचिव महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना तुरुंग म्हणून काम केल्यामुळे हा राजवाडा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी जवळचा संबंध आहे. याच ठिकाणी कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचे निधन झाले. 2003 मध्ये, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने ही जागा राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केली.