पुणे: पुणे शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिवसाढवळ्या घरफोड्या, चेन स्नॅचिंग, रस्त्यात अडवून लुटणे अशा घटना सातत्याने घडतायेत. अशातच चोरांनी चोरी करण्याचा मोठा पराक्रम केलाय. चोरट्यांनी पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या तीन रिक्षांची चाकेच चोरून नेली आहेत. अशा महान चोरांचं काय करावं असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
पुण्यातील मार्केटयार्ड मधून हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी पार्किंगमध्ये उभा केलेल्या तीन रिक्षांची चाके चोरून नेली. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. घरफोड्या, चेन स्नॅचिंग, रस्त्यात अडवून लुटणे, महिलांना फसवून सोनसाखळी चोरणे, अशा घटना घडत आहेत. आता आणखी एक खळबळजनक चोरीचा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांचा ताप वाढला आहे.
चाके चोरून काय करणार?
मार्केटयार्ड भागातील विचित्र प्रकारची चोरी पाहून रिक्षाचालकांनी डोक्याला हातच लावला. हे चोर चाकं घेऊन पुढं त्यांचं काय करणार? असा सवाल चालकांनी उपस्थित केला आहे. पोलीस तरी त्या चोरांना पकडून काय करणार? अशी प्रतिक्रिया चालकांनी दिली आहे.