खासदार संभाजीराजेंनी राजीनामा देऊन कोणावर परिणाम होणार आहे असा सवाल भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. पुण्यात आज पाटिल यांनी पत्रकार परिषद घेतली. ओबीसी आरक्षणात केंद्राचा काय संबंध असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी समज देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
संभाजी राजेंनी गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षण प्रश्नावर घेतलेल्या भेटीगाठी बाबत बोलताना चंद्रकांत पाटिल म्हणाले "खासदार छत्रपती संभाजी राजेंनी राजीनामा देऊन कोणावर परिणाम होणार आहे? महाराष्ट्रातील सरकार हे कोडग सरकार आहे. तसेच संभाजी राजेंवर हेरगिरी सुरू आहे त्याचा मी निषेध करतो."
दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या निर्णयात केंद्राचा काय संबध, राज्य सरकारने दीड वर्षांपासून मागासवर्गीय आयोग नेमला नाही, त्यांनी तो आधी नेमावा असा टोला देखील त्यांनी राज्य सरकार ला लगावला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
महेश लांडगेना समज देणार
आमदार महेश लांडगे यांनी मुलीचा लग्नाचा कार्यक्रमात गर्दी जमवल्या बाबत बोलताना पाटील म्हणले "आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नात मिरवणूक काढली, गर्दी जमवली हे चुकीचे आहे. महेश लांडगे यांना समज देण्यात येईल."