पुणो : पोलिसांनी अचानक केलेल्या हेल्मेटसक्तीचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हेल्मेटची सक्ती नागरिकांच्या हिताची असली तरी त्यांच्या मनात त्या विषयी संताप आहे. काही जणांनी हेल्मेटसक्ती योग्य असल्याचे सांगितले. हेल्मेटसक्तीसंदर्भात ‘लोकमत’ने नागरिकांची मते जाणून घेतली.
ल्लल्ल
पोलिसांनी विश्वासार्हता गमावली आहे, हेल्मेटसक्ती मूर्खपणाची आहे, शहरात बजबजपुरी असताना सक्ती कशाला, हेल्मेट वापरल्यास मागून येणा:या गाडय़ांचा अंदाज येत नाही, केवळ हेल्मेटसक्तीने काय होणार? पोलीस नियम पाळतात का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
ल्लल्ल
हेल्मेटचा वापर करणो आवश्यक
माङया घरातील व्यक्ती जर बाहेर जात असेल तर त्याने हेल्मेटचा वापर करणो आवश्यक आहे. कारण हेल्मेट आपल्याला अपघातातून वाचवू शकते. याप्रमाणोच प्रत्येक व्यक्तीचा जीव हा अमूल्य आहे. हीच भावना मला पुणोकरांबद्दलदेखील आहे. स्वत:ची काळजी स्वत: घेणो आवश्यक आहे.
- अॅड. वंदना चव्हाण
हेल्मेटला विरोध नाही
जी माणसे चारचाकीतून फिरतात ती दुचाकीस्वाराच्या मानगुटीवर बसलेले आहेत. ज्या पद्धतीने हेल्मेटसक्ती राबविली जात आहे, या गोष्टीने जनतेला फक्त त्रस होत आहे. आमचा हेल्मेटला विरोध नसून, सक्तीला विरोध आहे. आता असेही सांगण्यात येत आहे, की मागे बसणा:या व्यक्तीनेदेखील हेल्मेटचा वापर करावा. एका लग्नसमारंभात एक हजार लोक आले, नवरा-बायको असे दोघे आले तर हेल्मेटची संख्या दोन हजार होईल. ही हेल्मेट ठेवायची कुठे? जर लहान मुले असतील तर या मुलांच्या मापाची हेल्मेट आहेत का बाजारात उपलब्ध, असे अनेक प्रश्न आहेत.
- संदीप खर्डेकर
ल्लल्ल
मी हेल्मेट वापरतो, सुरक्षा आहे, पण मागून येणा:या गाडय़ांचा अंदाज येत नाही. अपघात होतो. हेल्मेटसक्ती ही पूर्ण सुरक्षा नाही. त्यामुळे सक्ती चुकीची आहे.
- गणोश कानडे
ल्लल्ल
दुपारी पोलीस गायब असतात, त्यावेळी होणा:या अपघातांची जबाबदारी कोणाची? नुसत्या हेल्मेटसक्तीने काय साध्य होणार?
- श्याम बिरदवडे
ल्लल्ल
दुचाकींसाठी असलेल्या ङोड पुलावरून रात्री दहानंतर चारचाकी गाडय़ांची ये-जा असते, त्यांच्यावर कारवाई होत नाही. वाहतूक शाखा नियोजनात्मक काम का करीत नाही? हेल्मेटसक्तीच का दिसते?- विजय लोणकर
ल्लल्ल
पार्किगचा प्रश्न भयंकर आहे. छोटय़ा रस्त्यांवर चारचाकी वाहने बेफाम जात असतात. त्यातून कितीतरी अपघात होतात. केवळ हेल्मेटसक्ती हा उपाय नाही.
- नईम शेख
ल्लल्ल
पोलीस आणि सरकारी कर्मचा:यांपैकी किती जणांनी हा नियम पाळला? गेल्या काळात पोलीस हेल्मेट घालून फिरत होते का?
- दत्तात्रय देवकर
ल्लल्ल
सुरक्षिततेसाठी हेल्मेट योग्यच. पण सक्ती किंवा दंड कशाला? प्रत्येकाला स्वत:च्या जीवाची काळजी असते. सक्ती चुकीचीच.
- मंगल मांजरे
ल्लल्ल
अपघातात केवळ डोक्याला लागल्यानेच मरण येते का? इतर अवयवांना दुखापत होऊनही मरण पावल्याची उदाहरणो आहेत. उद्या संपूर्ण शरीराला कवच घालण्याची सक्ती कराल का?
- रजत शहा
ल्लल्ल
दुचाकींच्या बेफाम वेगाला सरकारने यांत्रिक लगाम त्या पातळीवरून लावावा. 1क्क् सी.सी.पेक्षा जास्त क्षमतेची वाहनेच उपलब्ध होऊ देऊ नयेत. केवळ हेल्मेट हा सुरक्षा उपाय नाही.
- विजय बलकवडे
ल्लल्ल
शहरातील वाहतुकीची एकंदर स्थिती गंभीर असताना एकटय़ा हेल्मेटसक्तीने तसूभरही फरक पडणार नाही.
- सतीश कुलकर्णी
ल्लल्ल
अपनी सुरक्षा अपने हात. सक्ती कशाला? लोकशाहीत सक्ती केली जाऊ शकते?
- विनायक कांबळे
ल्लल्ल
हेल्मेट वापरायला हवे, पण महिलांना हेल्मेट बाळगणो खूप अवघड जाते. मी पूर्णपणो याच्याशी सहमत नाही.
- वर्षा पाटील
ल्लल्ल
हेल्मेट वापरणो चांगले आहे, पण मी हेल्मेट वापरत नाही. वळताना काहीच कळत नाही.
- गोपाल रेड्डी
ल्लल्ल
हेल्मेट मी आधीपासून वापरतो. ही सक्ती योग्य आहे. हेल्मेट वापरणो दुचाकीचालकांच्या फायद्याचे आहे.- राहुल
ल्लल्ल
मी दोन वर्षापासून हेल्मेट वापरतो. हेल्मेट वापरणो चांगलेच आहे, पण त्यामुळे मानेला त्रस होतो.
- प्रमोद वैराट
ल्लल्ल
हेल्मेट वापरणो जरूरीचे आहे. मी पुण्यात गाडी चालवत नाही. आमच्या नांदेडला वाहतूक कमी आहे, पण पुण्यात वाहतूक व अपघाताच्या प्रमाणामुळे हेल्मेट सक्तीचे आहे.
- अभिलाष जयकर
ल्लल्ल
हेल्मेट सक्तीचे आहे. मी हेल्मेट गाडीबरोबरच खरेदी केले व तेव्हापासूनच हेल्मेट वापरतो. पाचशे रुपये महत्त्वाचे नसून जीव महत्त्वाचा आहे.
- अंगद सुतार