इंदापूर: आपली पिढी आई वडिलांचा आदर करणारी अशी संस्कारीत पिढी म्हणून ओळखली जाते. परंतु, सुजय विखे पाटील यांनी केलेला भाजपामधील प्रवेश हा आई वडिलांना विरोध म्हणून आहे. आता जो आईवडिलांचे ऐकत नाही तो मतदारांचे काय ऐकणार, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुजय विखे पाटील यांनी नुकताच केलेल्या भाजपा प्रवेशावर केला आहे उपस्थित केला. उंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन याठिकाणी शुक्रवारी(दि. १५) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवार बोलत होते. या मेळाव्याला आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथ माने, मंगलसिद्धी परिवाराचे प्रमुख राजेंद्र तांबिले, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रविण माने व आदी मान्यवर उपस्थित होते. पवार म्हणाले, ज्या राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर येईल त्या राज्यातील शेतकºयांची कर्जमाफी करण्यात येईल. गेल्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनी लोकसभा एकत्रित लढली होती.मात्र, विधानसभा निवडणुकीत वेगळा विचार करून निवडणूक लढली त्याचा परिणाम राज्यातील सत्ता गेली.परिणामी केंद्र व राज्यात शेतकरी, रोजगार विरोधी असे भाजपा सरकार सत्तेवर आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला नाही, उद्योगधंद्यात मंदी आली. त्यामुळे रोजगारासाठी नियुक्त केलेले तरुण बेरोजगार झाले. त्यामुळे काँग्रेसचे राहुल गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार, अखिलेश यादव, यांच्यासह अनेकांनी एकत्र बसून शेतकरी विरोधी सरकारचा पाडाव करण्याचे निश्चित केले आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र, येथे युती झाली मात्र उत्तरप्रदेशात आघाडी झाली नाही. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक या पाच राज्यात सर्वाधिक २५० खासदार आहेत. त्या ठिकाणी आघाडी झाली नसली तरी भाजपा विरोधी लाट आहे. याचा विचार करुन स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये एकोपा असणे गरजेचे आहे. मध्यंतरी झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीत भाजपा विरोधी सत्ता आली. स्थानिक कार्यकर्त्यांनी हेवे - दावे बाजूला ठेवुन लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे. कोणीही कार्यकर्ताबाहेर इतरत्र जावू नये, निवडणूक पार पडेपर्यंत एक एक मत जमा करावे म्हणजे आपल्या आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतदान मिळून आपला विजय होईल. त्यामुळे घोंगडी बैठका घेवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षात कार्यकर्त्यांनी झाडून कामाला लागावे.
ठाण्यामधून आनंद परांजपे यांना तिकीट दिले असे सांगताना मध्येच थांबुन प्रदिप गारटकर पवारांनीच आनंद परांजपे यांना तिकीट दिले असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. _______________________________________ भाजपा सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटा बंदी केली, त्यावेळी १७ लाख ९७ हजार कोटी रुपये चलनात होते. नोटाबंदीनंतर पंधरा लाख कोटी रुपये चलनातून गायब झाले. अवघे दोन लाख हजार कोटी रुपये चलनामध्ये शिल्लक राहिले. एकूण चलनातून ८६ टक्के नोटा बंद झाल्या. याचा परिणाम लघु उद्योगावर झाला अनेक उद्योग बंद पडले, रोजगाराचे प्रमाण निच्चांकी आले हा सर्व परिणाम एकाधिकारशाही मुळे देशात झालेला दिसतो आहे. ___________________________________________