दिघी : दिघीजवळील मोकळ्या जागेत मद्यपींचा अड्डा भरलेला...नशेत तर्र झालेले, येणाºया जाणाºयांना शिव्या देत होते. त्यामुळे एका सजग नागरिकाने १०० नंबरवर फोन करून पोलिसांना हा प्रकार कळविण्याची तसदी घेतली. सामाजिक स्वास्थ्यास बाधा पोहोचविणारा हा प्रकार रोखण्याच्या उद्देशाने पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या सजग नागरिकाच्या वाट्याला अत्यंत कटू अनुभव आला. तेथे येऊन पोलीस तरी काय करणार? पोलीस एक दिवस कारवाई करतील, काही कालावधीतच पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती असेल, असा उपदेशाचे डोस पोलीसांकडून मिळाल्याने तक्रारदार आश्चर्यचकीत झाला.दिघीतील एका सोसायटीच्या अवारात सदस्यांमध्ये वादंग झाले. त्याचे पर्यावसान हाणामारीत होत असल्याचे लक्षात येताच १०० नंबरवर फोन लावला. कंट्रोल रूमचा नंबर देण्यात आला. कंट्रोल रूमला फोन केला असता तेथील अधिकाºयाने आॅनलाइन तक्रार देण्यास सांगितले. त्यांच्या टोलवा टोलवीमुळे तक्रारदार संभ्रमात पडला. शेवटी आॅनलाइन तक्रार नोंदविणे त्यास भाग पडले. ई-मेल वर पोच पावतीसुद्धा आली. थोडी हुशारी दाखवून तक्रारदाराने ‘आपले सरकार’ पोर्टलवर ही तक्रार नोंदवली. त्यावर कोणत्याही पोलीस अधिकाºयाकडून प्रतिक्रिया आली नाही. या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी प्राप्त झालेल्या ई-मेल वर रिप्लाय केला असता, पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पोलीस अधिकाºयाची भेट घ्या, असा संदेश त्यांना मोबाइलवर मिळाला.आॅनलाइन तक्रार देऊन सुशिक्षित असल्याचा फायदा उठवत आहात, असे खडे बोल तक्रारदार महेश यांना एका पोलीस अधिकाºयाने सुनावले. आपले सरकार पोर्टलवर दाखल केलेली तक्रार मागे घ्या, अशी तंबीही त्या अधिकाºयाने तक्रारदारास दिली. उद्धट भाषा वापरीत तक्रारदारास दिघी पोलीस चौकीत बोलावले. दुसºया दिवशी दिघी पोलीस चौकीत गेले असता, महत्त्वाची बैठक असल्याने भेटता येणार नाही, असे कारण सांगून अधिकारी निघून गेले. त्यामुळे दिघी पोलीस चौकीत तक्रार देण्यास नागरिक धजावत नसल्याची परिस्थिती आहे.
तेथे येऊन पोलीस तरी काय करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 3:25 AM