शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

एक साडी की किमत तुम क्या जानोगे..ड्रायक्लिनर्स बाबू!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 7:54 PM

इस्त्रीवाल्याला तक्रारदार महिलेला द्यावे लागले साडीचे पैसे..  

ठळक मुद्देइस्त्रीवाल्याला द्यावे लागले साडीचे पैसे इस्त्रीसाठी आलेली साडी केली खराब वेगवेगळ्या व्यावसायिकांविरोधात तक्रार

पुणे : इस्त्री करण्यासाठी दिलेली साडी खराब करून दिल्याप्रकरणी तक्रारदाराला विरुद्ध पक्षाने पाच हजार रुपये आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी दोन हजार रुपये द्यावेत, असा निकाल ग्राहक मंचाने दिला. मंचाचे अध्यक्ष अनिल खडसे, सदस्य क्षितीजा कुलकर्णी, संगीता कुलकर्णी यांनी हा निकाल दिला.तक्रारदार हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. मार्च २०१८ मध्ये ग्राहक मंचाकडे त्यांनी हा दावा दाखल केला होता. तक्रारदाराने डीलक्स डायर्स, ड्रायक्लीनर अ‍ॅण्ड  स्पेशल वॉशर्स, प्रशांतनगर, नवी पेठ, वानोरी शाखा मॅनेजर प्रविण कडू, शुभांगी थोरात, मनोज कक्कर यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. तक्रारदाराने स्वत: मंचापुढे हा दावा चालविला. ग्राहक संरक्षण कायदा कलम १९८६ चे कलम १२ नुसार हा दावा दाखल केला होता.तक्रारदार हे माजी लष्करी अधिकारी आहेत. ते हडपसर परिसरात राहतात. एप्रिल २०१७ मध्ये तक्रारदाराच्या पत्नीने डीलक्स ड्रायक्लीनर्सकडे सिल्क  क्रेप साडी इस्त्रीसाठी दिली होती. ही साडी नवीन होती त्यात कोणताही दोष नव्हता. तक्रारदार हे त्यांच्या पत्नीबरोबर साडी घेण्यासाठी डीलक्स ड्रायक्लीनर्सच्या वानवडी शाखेत गेले. मात्र तेव्हा त्यांना लक्षात आले की, संपूर्ण साडीवर तपकीरी रंगाचे डाग पडले आहेत. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की, साडीच्या घड्यांमध्ये तपकिरी रंगाचा कागद ठेवल्यामुळे असे डाग पडले आहेत. ते काढण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे तक्रारदार व त्यांची पत्नी परत मे २०१७ मध्ये साडी आणण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना त्याच प्रकारचे डाग साडीवर असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांना संबंधित शाखा मॅनेजरने डीलक्सच्या मालकांबरोबर बोला, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराच्या पत्नीने डीलक्सच्या शुभांगी थोरात यांच्याकडे संपर्क साधला.त्यानंतर जून २०१७ मध्ये त्या परत साडी घेण्यासाठी गेल्या असता, त्यांना साडीवर छोटी छिद्रे पडल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत संबंधित मॅनेजरकडे पुन्हा चौकशी केली असता, त्याने केमिकलच्या वापरामुळे आणि घासल्यामुळे छिद्रे पडल्याचे सांगितले. साडी पूर्ण खराब झाली होती. साडीची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे तक्रारदाराने मंचाकडे दावा दाखल केला. विरुद्ध पक्षाचे मनोज कक्कर यांनी याप्रकरणी लेखी जबाब सादर करून आरोप नाकारले. डीलक्सचे मालक मनोज कक्कर आहेत. तर थोरात या कर्मचारी आहेत, हे दाखल केलेल्या कागदपत्रावरून स्पष्ट होत असल्याचा अर्ज तक्रारदाराने सुनावणीदरम्यान केला.

तक्रारदार व त्यांच्या पत्नीने साडी कधी व किती रुपयांना खरेदी केल्याचा पुरावा सादर केला नाही. मात्र तक्रारीत त्यांनी साडीची किंमत ७,५०० आणि ंब्लाऊजची किंमत २,५०० रुपये असल्याचा उल्लेख केला आहे. इस्त्री करण्यासाठी दिलेल्या साडीची किंमत मध्यम स्वरूपाची असेल, असे गृहित धरण्यात येते. तक्रारादाराला पाच हजार रुपयांची नुकसानभरपाई व मानसिक त्रासापोटी दोन हजार रुपये द्यावेत, असा निकाल ग्राहक मंचाने दिला. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयWomenमहिला