पुणो : गरिबीत जगत असलेली एक महिला अचानक श्रीमंत होते. एरवी लक्ष न देणारा तिचा भाऊ तिला जेवायला बोलावतो. सुग्रास जेवण करण्याऐवजी ती बहीण अंगावरील दागिने काढून जेवणाच्या ताटावर ठेवते आणि भावाला म्हणते, ‘हे जेवण माङयासाठी नाही, तर माङया दागिन्यांसाठी आहे.’ असाच काहीसा प्रकार विदेशी खाद्यपदार्थाच्या आलिशान उपाहारगृहामध्ये पाहायला मिळाला. एका गणोशोत्सव मंडळाच्या कार्यकत्र्यानी स्वच्छता मोहिमेत केलेल्या मदतीची उतराई म्हणून त्यांना आलिशान उपाहारगृहात जेवण्याचे निमंत्रण दिले होते.
परिस्थितीमुळे हलाखीचे जीवन जगत असलेले खेळणी विकणारे आणि वेळप्रसंगी भिक्षा मागून कुटुंबकबिला जगविणारे अगदी ‘व्हाईट कॉलर’ सुशिक्षितांच्या भाषेतील भिकारी अचानक डेक्कन येथील या आलिशान उपाहारगृहात गेले. पोटभर खाऊन बिल भरल्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकाचे डोळे विस्फारले. आपल्या उपाहारगृहाच्या तथाकथित प्रतिष्ठेला बाधा पोहोचू लागली म्हणून या व्यवस्थापकाने थेट पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून उपाहारगृहात गोंधळ सुरू असल्याची माहिती दिली. परंतु, पोलीस घटनास्थळी पोहोचले व वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे समोर आले.
खंडूजीबाबा चौकामधील श्रीकृष्ण मंडळाच्या कार्यकत्र्यानी गणोशविसजर्न मिरवणूक संपल्यावर नदीपात्रच्या स्वच्छतेची मोहीम राबविली होती. नदीपात्रत जमा झालेला कचरा मंडळाच्या कार्यकत्र्यानी या भटक्या विक्रेत्यांच्या मदतीने साफ केला होता. त्यांना श्रमपरिहार देण्याकरिता मंडळाच्या कार्यकत्र्यानी एका आलिशान हॉटेलमध्ये जेवण देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरविले.
सर्व जण शांततेत बाहेर पडत असताना व्यवस्थापकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून काही जण तोडफोड करीत असल्याची खोटी माहिती दिली. काही मिनिटांतच तेथे दाखल झालेल्या पोलिसांना मंडळाच्या कार्यकत्र्यानी तेथील सीसी टीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली. त्यामध्ये असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे निदर्शनास आले. त्यावर संतापलेल्या कार्यकत्र्यानी ‘आता आम्ही खरेच तोडफोड करणार,’ असा पवित्र घेतल्यामुळे व्यवस्थापक चांगलाच घाबरला. त्याने मंडळाची माफी मागितल्यावर प्रकरणावर पडदा पडला. व्यवस्थापकाला दम भरत पोलीस काही न करताच निघून गेले.
झगमगाट आणि लखलखाट पाहून अचंबा
कार्यकर्ते या सर्वाना घेऊन हॉटेलमध्ये गेले. सगळ्यांना त्या दुकानाचा झगमगाट आणि लखलखाट पाहून अचंबा वाटला. त्या उपाहारगृहातील नावदेखील माहिती नसलेले पदार्थ या सर्वानी यथेच्छ खाल्ले. तेथे लावलेल्या चित्रंकडे बोटे दाखवून हवा तो पदार्थ त्यांनी मागून खाल्ला. या खाद्यपदार्थाचे झालेले 2 हजार 4क्क् रुपयांचे बिल मंडळाच्या कार्यकत्र्यानी काऊंटरवर भरले.