स्वतःच्या मालकीचे घर घेणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अति महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक आहे. अनेकांसाठी ते स्वप्न साकारण्यासारखे आहे. प्रॉपर्टी खरेदी करणे ही क्लिष्ट प्रक्रिया आहे. आयुष्यभराच्या बचतीची गुंतवणूक चिरकाल टिकणारी स्वप्ने आणि आठवणी यांचा समावेश असतो. असे असताना इतकी मोठी गुंतवणूक करताना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी एखाद्याने आपल्या स्वप्नातील घर खरेदी करण्यापूर्वी कोणत्या घटकांना प्राधान्य दिले पाहिजे, याचा विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. अचूक खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी लक्षात घ्यावयाची काही घटक पुढीलप्रमाणे आहेत.
आर्थिक परिणाम : प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी सर्वांत महत्त्वाच्या पैलूंपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे गृहकर्ज ज्यात बहुतेक प्रकरणांमध्ये पंधरा ते तीस वर्षांच्या गृहकर्जाच्या कालावधीसह आपली जवळजवळ आजीवन बांधीलकी असते. नियमित घरगुती खर्चाचा विचार करून गृहकर्जाच्या मासिक हप्त्याची तरतूद करणे आवश्यक आहे.
डेव्हलपर्सचे प्रोफाइल : रिअल इस्टेट हा सर्वांत लाभदायक व्यवसायांपैकी एक आहे. हा व्यवसाय बऱ्याच अव्यावसायिक लोकांना आकर्षित करतो. जे रिअल इस्टेट प्रकल्प सुरू करून जलद गतीने पैसे कमवू पाहत आहेत, रिअल इस्टेट डेव्हलपर असणे ही प्रतिष्ठेची बाब असल्याने बरेच योग्य परिश्रम न करता व्यवसायात येऊ इच्छितात. ज्यामुळे प्रकल्पाच्या बांधकामात दरम्यान गुंतागुंत होते. याच कारणाने सध्याच्या प्रकल्पातील कुठल्याही युनिटचा विचार करताना डेव्हलपरचे पूर्वीचे प्रकल्प डिलिव्हरी कालावधी आणि बांधकामाची गुणवत्ता यावर अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे.
स्थळ आणि परिसर : आपण ज्या भागात राहणार आहोत तो परिसर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भौतिक पायाभूत सुविधा स्थान जे आपण वारंवार वापरात असलेल्या सुविधांसह उपलब्ध करून देतो. शाळा, रुग्णालय, कामाची जागा, सुपरमार्केट सभोवतालचे क्षेत्र यास आपल्यापैकी अनेकांचे प्राधान्य असते. शहराच्या सर्व महत्त्वाच्या भागांशी हा परिसर किती चांगल्या पद्धतीने जोडला गेला आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या आवडीनुसार जागा सोयीची आहे का, हेदेखील पडताळणी करणे आवश्यक आहे. विविध पार्श्वभूमीवर बरेच घटक असू शकतात; परंतु वरील काही सर्वांत सामान्य पैलू आहेत, त्यांचा विचार प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. विश्वासार्ह नोंदणीकृत सल्लागारांची निवड ही परिसर प्रकल्प आणि डेव्हलपर कोणत्याही मालमत्तेसंदर्भात निर्णय घेण्याचा भार हलका करते. बहुतांशी सल्लागारांना प्रॉपर्टी निवडताना विचारात घेण्यासारख्या घटकांविषयी ग्रहण माहिती असते जी तुमच्या आर्थिक परिस्थिती आणि घरांच्या गरजा लक्षात घेऊन तुमच्यासाठी कुठली प्रॉपर्टी योग्य आहे, हे जाणून घेण्याचे कौशल्य बहुतांश सल्लागारांकडे असते. ज्यामुळे आपली प्रॉपर्टी खरेदी अचूक आणि लाभदायक ठरते.
-दर्शन चावला, अध्यक्ष,
प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे