मागील काही दिवासापासून पुण्याती प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर एका गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृ्त्यू झाल्याची घटना समोर आली. यानंतर राज्यभरातून संतापाची लाट पसरली. दरम्यान, आज दीनानाथचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी त्यादिवशी भिसे यांचा मला फोन आला होता, मी त्यांना पुढच्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या,असंही केळकर म्हणाले.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डॉ. केळकर यांनी यांनी भिसे यांचा फोन त्या दिवशीची आल्याचे सांगितले. डॉ. केळकर म्हणाले, त्या दिवशी मला रुग्णाच्या नातेवाईकांचा फोन आला होता. त्यांनी त्यावेळी सांगितले की, मला रुग्णालयातून डिपॉझिट मागत आहे. माझ्याकडे तेवढी रक्कम नाही. मी त्यांना तुमच्याकडे रक्कम किती आहे विचारले. यावेळी त्यांनी दोन-अडीच लाख रुपये असल्याचे सांगितले. मी त्यांना तेवढे भरा बाकी सर्व सूचना मी देतो असं सांगितलं. यानंतर या पलिकडे काय झालं हे मला कळलं नाही, असंही डॉ. केळकर म्हणाले.
'मी ऑपरेशन करत असताना फोन आला'
"मी ऑपरेशन करत असताना एकदा फोन आला मी घेतला नाही. दुसऱ्यांदा फोन आल्यानंतर माझ्या असिस्टंटने सारखा फोन करत आहेत घ्या असं सांगितलं. मी फोन घेतला आणि तुम्हाला शक्य आहे तेवढे भरा. एवढंच सांगितलं, बाकी काही बोलणं झालं नाही. मला हा फोन ५ वाजता आला नाही दुपारी सव्वा दोन वाजता आला होता, असंही डॉ. केळकर यांनी सांगितले.