पुणे: भाजपतर्फे नुकतेच राज्यसभेवर नियुक्त झालेल्या नारायण राणे अजूनही जिल्हा काँग्रेस भवनाच्या परिसरात लावलेल्या जाहिरात फलकावर झळकत आहे. परंतु,आजदेखील राणे काँग्रेस पक्षाच्या फलकावर विराजमान आहे. जाहिरात फलकावर राणेंचा फोटो आढळल्याने लोकांसह काँग्रेसच्या काही नेते आणि कर्मचाऱ्यांच्या देखील भुवया उंचावल्या आहेत. पुणे शहर जिल्हा काँग्रेस भवन येथे हा प्रकार निदर्शनास आला आहे. राणेंच्या जाहिरात फलकावरील छायाचित्रामुळे दिवसभर चर्चेचा विषय ठरला. काँग्रेसमध्ये असंतुष्ट असलेल्या नारायण राणे यांनी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर राणेंंनी काँग्रेसची कार्यप्रणाली, पक्षातील काही नेत्यांवर सडकून टीका देखील केली. त्यानंतर त्यांनी स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. सुरुवातीला नारायण राणे राज्यसभेवर जाण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. मात्र, भाजपाने त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळवले. काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राणे यांना राज्यसभेची आॅफर अमान्य असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र भाजपाने त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळवले होते.
अजूनही नारायण राणे झळकतात काँग्रेसच्या फलकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 6:01 PM
काँग्रेस भवन येथे हा प्रकार निदर्शनास आला आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे भवन येथे हा प्रकार निदर्शनास आला आहे.
ठळक मुद्देजाहिरात फलकावरील छायाचित्रामुळे दिवसभर चर्चेचा विषय