शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी कधी पकडणार ; हमीद दाभोलकर यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 2:49 PM

डॉ. नरेंद्र  दाभोलकरांच्या मारेक-यांचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते. केवळ त्यांच्या विचारांना विरोध करण्यासाठी भडकावले गेल्याने हा खून करण्यात आला.

पुणे: डॉ. नरेंद्र  दाभोलकरांच्या मारेक-यांचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते. केवळ त्यांच्या विचारांना विरोध करण्यासाठी भडकावले गेल्याने हा खून करण्यात आला. अशा पार्श्वभूमीवर मारेक-यांच्या इतकेच त्यांची डोकी नियोजनबद्ध पद्धतीने भडकवणारे सूत्रधार देखील जबाबदार आहेत .जोपर्यंत हे सूत्रधार मोकाट आहेत तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम आहे. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी पकडले, सूत्रधार कधी पकडणार? असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शासनाला विचारला आहे.          डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला येत्या २० ऑगस्टला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला येत्या २० आॅगस्टला सहा वर्षे पूर्ण होत आहेत .उच्च न्यायालयाने अनेक वेळा फटकारल्या नंतर गेल्या वर्षी सीबीआय ने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांना अटक केली होती. त्यानंतर अनेक वर्षे लांबलेल्या या प्रकरणातील तपास जलदगतीने पूर्णत्वाला जाईल आणि या खुनाच्या मागील सूत्रधारांना अटक केली जाईल अशी अपेक्षा होती.पण तपास हा अतिशय संथ गतीने सुरु असल्याचे दिसून येत असल्याकडेही महाराष्ट्र अंनिसने लक्ष वेधले . या वेळी महाराष्ट्र अंनिस चे प्रधान सचिव मिलिंद देशमुख ,पुणे जिल्हा कार्यध्यक्ष नंदिनी जाधव ,पुणे शहर अध्यक्ष श्रीपाल ललवाणी, दीपक गिरमे आणि  हमीद दाभोलकर उपस्थित होते. डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, डॉ नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासातून आणि आजपर्यंत दाखल झालेल्या आरोपपत्रांमध्ये हे चारही खून एका सामाईक उद्दिष्टाने आणि एकाच विशिष्ट कट्टरपंथीय संघटनेच्या लोकांकडून झाल्याचे पुढे आले आहे. तरी देखील  शासन या संघटनेविषयी ठोस कारवाई करताना दिसत नाही हे निषेधार्ह आहे. त्यामुळे आणखी वेळ न दवडता या सूत्रधारांवरती कारवाई करण्यात यावी.डॉ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाच्या मध्ये अटक झालेल्या  अमोल काळे , अमित दिग्वेकर ,राजेश बंगेरा या तिघांवर सीबीआयने वेळेत आरोपपत्र दाखल केले नसल्याने त्यांना जमीन मंजूर झालेला आहे. इतर गुन्ह्यात अटक असल्याने जरी अजून त्यांची सुटका झाली नसली तरी चारही विवेकवाद्यांच्या खुनामध्ये सहभागी असलेल्या लोकांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात सीबीआय अक्षम्य दिरंगाई करीत असल्याची खंत देखील त्यांनी या वेळी व्यक्त केली. दाभोलकर यांच्या खुनाच्यासाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलांचे भाग मुंबई जवळच्या खाडीतून शोधून काढण्यासाठीच्या परवानग्या मिळण्यासाठी उच्च न्यायालयाने वेळोवेळी नाराजी दाखवून देखील जवळजवळ सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ परवानगी मिळू शकत नाही याकडे देखील त्यांनी या वेळी लक्ष वेधले. 

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखूनPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग