पुणे : गुजरात विद्यापीठाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन पीएम मोदींच्या पदवीची माहिती आरटीआय कायद्यांतर्गत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देण्याचा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. एप्रिल 2016 मध्ये तत्कालीन सीआयसी एम श्रीधर आचार्युलू यांनी दिल्ली विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठाला सीएम केजरीवाल यांना पीएम मोदींना दिलेल्या पदवीबद्दल माहिती देण्याचे निर्देश दिले होते. तीन महिन्यांनंतर विद्यापीठाने या आदेशाविरोधात याचिका दाखल केली तेव्हा गुजरात उच्च न्यायालयाने सीआयसीच्या आदेशाला स्थगिती दिली.
गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पदवीची मागणी करणाऱ्या प्रकरणात शुक्रवारी निकाल दिला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहिती देण्याचे गुजरात विद्यानव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर पीठाला निर्देश देणारा केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याशिवाय, न्यायालयाने केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याच दरम्यान आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
"मोदींची ही डिग्री बोगस असल्याचं लोक म्हणतात. पण मी म्हणतो- ‘Entire Political Science’ या विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी डिग्री आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच ट्विटमध्ये एका डिग्रीचा फोटो शेअर केला आहे. मोदींची डिग्री फ्रेम करून संसद भवनात लावा असंही म्हटलं आहे. डिग्रीचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यावरून चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत करता करता इतक्या बोलण्याची पात्रता खाली चालली आहे. आपण कोणाबद्दल बोलावं कळत नाही. देशाचे पंतप्रधान ज्यांना जगात उच्च स्थान मिळालं आहे. त्यांच्याबद्दल आपण काय बोललो पाहिजे त्याचा संयम ठेवला पाहिजे. त्यामुळे देशात नकारात्मक भावना तयार होत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले आहेत.
गिरीश बापट यांच्या अस्थी दर्शनासाठी पाटील पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गिरीश बापट यांच्या अस्थींचा कलश ठेवला होता. खूप लांबून लोकं येत आहेत. आज हा कलश गौरव वाराणसीला घेऊन चालला आहे. या अस्थिंच दर्शन घेण्यासाठी मी आलो होतो. मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो. गिरीश जी यांचा स्वभाव होता की सगळ्या पक्षांचा आदर करायचा. त्यामुळे सगळ्यांना आपला घरातील माणूस गेला आहे असं वाटतं असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे.