पुणे : पुण्याजवळील शिवनेरी गावात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळते. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कोव्हर्ट आॅपरेशन सुरू होते. माहिती प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, दहशतवाद्यांच्या ठिकाणाचा शोध घेतला जातो. या माहितीच्या आधारे सुरू होते लष्कराची कारवाई. गोळीबार, बॉम्बवर्षाव.. हेलीकॉप्टरमधून उतरणारे चपळ जवान दहशदवाद्यांच्या तळाकडे जात त्यांना घेराव घालतात. त्यांचा खात्मा करतात आणि संपूर्ण गावाला त्यांच्या तावडीतून मुक्त करतात. हा प्रसंग आहे पुण्यातील औंध मिलीटरी तळातील भारत आणि श्रीलंका यांच्या पाचव्या मित्र शक्ती युद्ध सरावाचा. संपूर्ण जग आज दहशतवादी कारवायांनी ग्रासले आहे. दहशतवादांचा बिमोड करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्कराचा युद्धसराव गेल्या १३ दिवसांपासून पुण्यात सुरू आहे. आज प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. औंध येथील लष्कराच्या लळावर काल्पनिक उभारलेल्या गावात हे प्रात्यक्षिक करण्यात आले. भारतीय लष्कराच्या महार रेजिमेन्टचे जवान आणि श्रीलंका लष्कराच्या सिंह रेजीमेंन्टच्या जवानांनी ही संयुक्त कारवाई केली. नियोजन, माहिती आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत दहशतवाद्यांचा ठिकाणे जवानांनी शोधली. त्यांच्या लपण्याच्या ठिकाणी छुपे खंदक बनवून त्यांच्यावर सलग वॉच ठेऊन ही कारवाई करण्यात आली. भारतीय लष्कराचे ब्रिगेडियर अशोक चंद्रा तर श्रीलंकेच्या लष्कराचे ब्रिगेडियर अजिथ पाल्लेवाल यांनी या प्रात्यक्षिकांचा आढावा घेतला. दोन्ही देशांचे १२० जवान यात सहभागी झाले होते. यावेळी अशोक ब्रिगेडियर चंद्रा म्हणाले, दहशतवाद ही संपूर्ण देशांसमोरील प्रमुख समस्या आहे. जगातील अनेक देशांसमोर ही मोठी समस्या आहे. १३ दिवस चाललेल्या या प्रात्यक्षिकांचा दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी या प्रशिक्षणादरम्यान दोन्ही देशांनी माहितीचे आदान प्रदान करत ही कारवाई केली. या प्रकारचे युद्धाभ्यास भविष्यातही दोन्ही देशादरम्यान होईल. ब्रिगेडियर अजिथ पल्लेवाल म्हणाले, जागगिक दहशतवादाला तोंड देण्यासाठी या प्रकारचे प्रात्यक्षिके महत्त्वाची आहे. दोन्ही इंटेलीजन्स आणि आॅपरेशन यामुळे जवानांना विविध प्रसंगाना सामोरे जाणे शक्य होणार आहे. यामुळे दोन्ही देशातील विश्वास वाढीबरोबर जागतिक शांतता टिकवण्यासाठी मदत होणार आहे.
हेलीकॉप्टरच्या मदतीने थेट युद्धभूमीवरदहशतवाद्यांची माहितीमिळताच कमी वेळात त्यांच्या ठिकाणांचा वेध घेण्यासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीने जवान कसे जातात याच बरोबर जखमींना युद्धभूमीतून बाहेर कसे काढतात याचे प्रात्यक्षिक जवानांनी दाखवले.
छुप्या खंदकातून टेहळणीदहशतवाद्यांची माहिती मिळल्यानंतर त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी तसेच त्यांची अधिकाअधिक माहिती मिळवण्यासाठी छुपे खंदक तयार करण्यात आले होते. जवळपास ७२ तास जवान या खंदकात राहू शकतात. या खंदकात खान्यापिण्याच्या सामानाबरोबरच वायफाय सेवा तसेच रेडीओ फ्रिक्वेन्सीद्वारे अधिका-यांशी संवाद सांधण्याची यंत्रणाही जवानांबरोबर असते.
२४० जवानांचा सहभागदहशतवादी विरोधाच्या या संयुक्त कारवाईत दोन्ही देशांचे मिंळून २४० जवानांनी या सरावात सहभाग घेतला.
भविष्यात बटालीयन स्तरावर होणार सरावदोन्ही देशात आतापर्यंत चार वेळा युद्ध सराव झाले आहेत. आतापर्यंत ग्रुप तसेच कंपनीस्तरापर्यंत हे सराव झाले आहेत. भविष्यात दोन्ही देशांच्या लष्कराच्या बटालीयन स्तरावर हे सराव होऊ शकतात.