पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांची सध्या स्थिती अत्यंत बिकट आहे. जिल्ह्यात जवळपास ४ हजार ५९० अंगणवाड्या भरत आहे. मात्र, त्यातील निम्म्या म्हणजे २ हजार २३६ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याने चिमुरड्यांना ऊन, वारा, पावसाचा सामना करत ‘अ, ब, क’ चे धडे गिरवावे लागत आहेत. जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास विभागामार्फत जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये ४ हजार ५९० अंगणवाड्या भरत आहेत. मात्र, त्यातील २ हजार ३३४ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे, तर उर्वरित २ हजार २३६ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याने त्या इतर ठिकाणच्या जागेवर भरवण्यात अंगणवाडी सेविकांना मोठी कसरत करावी आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांबरोबर चिमुरड्यांना ऊन, वारा, पावसामध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे. विशेषत: २ हजार २३६ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याने इतर जागांवर घ्यावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने खासगी जागेत २५७, समाजमंदिरांमध्ये ७१३, झाडाखाली किंवा चावडीमध्ये ११२, तर प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या खोल्यांमध्ये ८३२ ठिकाणी अंगणवाडी सध्या भरत आहे. त्याचबरोबर त्या-त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ३२२ खोल्यांमध्ये अंगणवाडी भरवण्यात येत आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील अंगणवाडीच्या इमारती बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि आदिवासी उपाययोजनेंतर्गत निधी उपलब्ध करण्यात येतो. मात्र, हा निधी कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तो जास्तीत जास्त १५० अंगणवाड्यांना हा निधी देण्याची मर्यादा आहे. त्यामुळे यावर २ हजार २३६ अंगणवाड्यांना इमारती बांधकाम तातडीने करण्यासाठी अडथळा येत आहे. त्यामुळे याबाबत खासदार, आमदार आणि स्थानिक जिल्हा परिषद सदस्य यांनी प्रयत्न करणे अंत्यत गरजेचे झाले आहे. पुणे जिल्ह्यातील या २ हजार २३६ अंगणवाड्यांच्या इमारतींच्या बांधकामासाठी खासदार आणि आमदार यांच्या स्थानिक विकासकामांच्या निधीमधून या अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे अंगणवाडी सेविकांबरोबर स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. अन्यथा या चिमुरड्यांची पुढील शैक्षणिक वर्षात त्यांची हेळसांड होईल. त्यामुळे याबाबत पावले उचलणे गरजेचे आहे.सव्वादोन हजार अंगणवाड्यांना नाही इमारतजिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील एकूण ४ हजार ५९० अंगणवाड्यांपैकी जवळपास २ हजार २३६ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याने चिमुरड्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही पार्श्वभूमी पाहता चिमुरड्यांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासन, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आणि विविध सामाजिक संघटनांनी याविषयी गांभीर्याने पावले उचलण्याची गरज असल्याची भावना अनेक अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली आहे.
चिमुकल्यांना कधी मिळणार हक्काची जागा?
By admin | Published: April 25, 2016 2:09 AM