पुणे/कात्रज : लॅाकडाऊनमुळे गेली अकरा महिने प्राणिसंग्रहालये बंद आहेत. पण, मुंबईतील प्राणिसंग्रहालय दि. १५ फेब्रुवारीपासून खुले केले आहेत. कोरोनाबाबतची योग्य ती दक्षता घेऊनच पर्यटकांना आत प्रवेश देण्यात येत आहे. त्यासाठी नियमावली देखील जाहीर केली आहे. पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय मात्र अजूनही बंदच आहे. ते कधी खुले होईल, याबाबत अजून काहीच निर्णय झालेला नाही.
लॅाकडाऊनमुळे प्राणिसंग्रहालये बंद करण्यात आली होती. कारण, तिथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होते. कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय देखील बंद असल्याने त्याला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे. वर्षाला लाखो पर्यटक या प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. प्रवेश शुल्काच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा होतात. परंतु, गेली अकरा महिने काहीही उत्पन्न नसल्याने प्राणिसंग्रहालयाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. प्राणिसंग्रहालयात सुमारे चारशेहून अधिक विविध प्रजातीचे पशू-पक्षी, प्राणी आहेत. त्यामुळे दररोज त्यांच्यासाठी खाद्य लागते. त्यामुळे काही वर्षांपासून प्राणी दत्तक योजनाही सुरू आहे.
मुंबईत प्राणिसंग्रहालयात प्रवेश करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसारच पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. हीच नियमावली पुण्यातील प्राणिसंग्रहालयासाठी लागू करून ते खुलं करता येऊ शकते.
————————————
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे प्राणिसंग्रहालय कधी उघडण्याचा निर्णय होईल, हे सांगता येत नाही. येथील प्राण्यांची काळजी कर्मचारी रोज घेत आहेत. प्राणी नेहमीप्रमाणेच त्यांचे आयुष्य जगत आहेत. वरिष्ठांकडून जोपर्यंत निर्णय येत नाही, तोपर्यंत प्राणिसंग्रहालय बंदच असेल.- राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय——————————————-राजीव गांधी प्राणिसंग्रहालय दृष्टिक्षेपात -दिवसाला ५ ते ७ हजार पर्यटक द्यायचे भेटवर्षाला १७ ते १८ लाख पर्यटकांची भेटलाॉकडाऊनमुळे आतापर्यंत तीन ते चार कोटींचा फटका५३ प्रजातीचे ४५० विविध पशू-पक्षी, प्राणी१३० एकर परिसरसुमारे ४० सीसीटीव्ही कॅमेरेवार्षिक उत्पन्न ५ ते ६ कोटी रुपये.