लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा अजूनही काढला नाही. त्यामुळे शुक्रवारी शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके आणि कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करीत दिव्याला पुष्पगुच्छ अर्पण केला.केंद्र सरकारने राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, सर्व मंत्री, त्याचबरोबर देशातील सर्व शासकीय अधिकारी यांच्या सरकारी गाडीवरील लाल, पिवळे दिवे काढण्याचे आदेश दिले होते. याची अंमलबजावणी १ मे २०१७ पासून करण्यात आली आहे. मात्र आज अनेक राजकीय पुढारी दिवे काढण्यास टाळाटाळ करीत आहेत. दिवा काढण्याऐवजी त्यावर टोपी घालून ठेवली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या गाडीवरील दिवा अजूनही काढला नाही. त्यामुळे शुक्रवारी शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके आणि कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करीत अध्यक्षांच्या गाडीवरील लाल दिव्याला पुष्पगुच्छ अर्पण करून निषेध व्यक्त केला.
अध्यक्षांच्या गाडीचा लाल दिवा कधी उतरणार?
By admin | Published: May 13, 2017 4:26 AM