शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

सरस्वतीच्या शृंखला कधी गळून पडणार?

By admin | Published: January 25, 2016 1:00 AM

देशाला विकसित करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वायत्तता अभावानेच दिसून येते.

पुणे : देशाला विकसित करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वायत्तता अभावानेच दिसून येते. शिक्षण पद्धतीतील लायसन्स, परमिटराज दूर झाल्याशिवाय हे साध्य होईल, असे वाटत नाही. देश स्वतंत्र झाला त्याप्रमाणे सरस्वतीच्या शृंखला कधी गळून पडणार, असा प्रश्न सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी उपस्थित केला.गोगटे फाउंडेशनचे संस्थापक रावसाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या रावसाहेब गोगटे गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. मुजुमदार बोलत होते. डॉ. मुजुमदार यांच्यासह फ्रिशमन प्रभू, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर प्रभू, चितळे बंधूंचे श्रीकृष्ण चितळे, डॉ. वैजयंती खानविलकर, टीबीके कंपनीचे संचालक माधव किर्लोस्कर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ क्रीडापटू, उद्योजक माधवराव आपटे यांच्या हस्ते रविवारी झाले. फाउंडेशनचे अध्यक्ष अरविंद गोगटे, मुख्य समन्वयक ज्योती गोगटे, विश्वस्त माधव गोगटे व्यासपीठावर होते.हा गुणवत्तेचा सन्मान असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.अध्यक्षीय पदावरून बोलताना माधवराव आपटे यांनी रावसाहेब गोगटे यांच्या कार्याचा गौरव करून सर्व क्षेत्रांत यशाचे शिखर गाठले तरी त्यांचे पाय जमिनीवर होते, असे सांगितले. माणूस म्हणूनही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यावर त्यांचीच पहिली अभिनंदनाची तार आल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू, चितळे, खानविलकर, किर्लोस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.अरविंद गोगटे यांनी प्रास्ताविकात पुरस्कार वितरणामागील भूमिका विशद करून पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. डॉ. ज्योती गोगटे यांनी मानपत्राचे वाचन केले. माधव गोगटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)