त्यांनादेखील या कचरा समस्येचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पादचाऱ्यांना पायी चालताना रस्त्यावरून तर जावे लागतेच. परंतु या परिसरातून जाताना नाक मुठीत ठेवून चालावे लागते.
महापालिकेकडून दर पंचवार्षिक अंदाज पत्रक योजनेतून पदपथ चांगल्या परिस्थित असतानाही ते काढून पुन्हा नव्याने पदपथ तयार केले जातात.
मात्र या रस्त्यावर कचरा संकलन करून त्याचे विलगीकरण करण्यासाठी कुठलीही तरतूद न केल्यामुळे येथील पदपथांवर कचरा साचवला जात असून येथील पदपथांवर लाखो रुपये खर्च करून येथे परिसरातील कचरा सचावला जातो. पदपथावर साचवलेला कचरा उचलून न नेल्यामुळे येथे कुत्री, डुक्कर यांसारख्या प्राण्यांची संख्यादेखील जास्त असते. तसेच येथे विद्युत फिडर पिलरदेखील असून या पिलरमधून अतिउच्च दाबाच्या वीजवाहक तारा गेल्या आहेत. त्यामुळे येथे शॉर्ट सर्किट होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे येथील पदपथ कचरामुक्त करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, अशी येथील नागरिक मागणी करत आहे. ................................................................................
प्रतिक्रिया
या परिसरात सर्वात जास्त दाट लोकवस्ती असून येथील नागरिकांनी जर कचऱ्याचे विलगीकरण करून कचरा दिला तर या ठिकाणी कचरा जमा न होता उचलला जाईल. त्यामुळे येथे कचरा साठवला न जाता पदपथ मोकळे राहतील. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी घरातूनच कचरा विलागीकरण करून द्यावा, असे आम्ही वारंवार आवाहन तर करतोच परंतु प्रबोधनदेखील करत आहे.
गणेश सोनुने, सहायक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय