८३८ एसटी गाड्यांना ‘व्हीटीएस प्रणाली’ : बसस्थानकावर मोठी स्क्रीन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रवाशांना आता आपल्याला ज्या एसटीने प्रवास करायचे आहे. त्या एसटी लाईव्ह लोकेशन समजत आहे. त्यामुळे त्यांना बसस्थानकावर ताटकळत बसण्याची गरज नाही. शिवाय त्यांना नियंत्रकाला गाडीबद्दल सारखी माहिती विचारण्याची गरजदेखील नाही. कारण, राज्य परिवहन महामंडळाने एसटीत ‘व्हीटीएस’ म्हणजेच व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम बसविली असून ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली आहे.
पुणे विभागातील ८३८ गाड्यांना व्हीटीएस प्रणाली बसविली आहे. ही प्रणाली पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिमला जोडली देखील आहे. त्यामुळे आता प्रवाशांना घरबसल्या रेल्वेप्रमाणे एसटीचे देखील करंट लोकेशन समजत आहे. ज्या प्रवाशांना कडे स्मार्ट फोन नाही अशासाठी बसस्थानकावर मोठे स्क्रीन बसविले आहे. त्यामुळे त्यांना गाडीची चौकशी करण्यासाठीची चौकशी केंद्रावरची गर्दी कमी झाली आहे.
बॉक्स १
गाडीचे लोकेशन समजणार :
व्हीटीएस प्रणालीत जीपीसचा देखील अंतर्भाव आहे. त्यामुळे एसटी डेपोपासून सुमारे तीस किमी अंतरावर कोणतीही एसटी गाडी आल्यास त्याची माहिती पीआयएस (पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम) समजेल. यात संबंधित गाडी किती वाजता स्थानकवर येईल. तिचे लाईव्ह लोकेशन कोणते याची माहिती मिळते.
बॉक्स २
बसस्थानकावर मोठे स्क्रीन
प्रवाशांना गाडीची माहिती मिळावी याकरिता पुणे विभागातील सर्व बसस्थानकवर मोठे स्क्रीन लावण्यात आले. या स्क्रीनवर गाडी कुठे आहे, ती किती वाजता येईल, कोणत्या फलाटावर येईल आदी माहिती स्क्रीन वर दिसते. त्यामुळे प्रवाशाना नियंत्रकाकडे जाण्याची गरज नाही.
बॉक्स ३
चालकांच्या निष्काळजीपणाला चाप :
व्हीटीएस प्रणालीमुळे गाडीवर सतत लक्ष असते. गाडी कुठे आहे, कुठे थांबली, गाडीचा वेग किती आहे, याबाबत सातत्याने वाहतूक विभाग नोंद घेते. त्यामुळे ठरवून दिलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त गाडी कुठे थांबली तर त्याची तत्काळ माहिती नियंत्रकाला मिळते. त्यामुळे चालकांच्या निष्काळजीपणाला आपसूकच चाप लागतो.
कोट : पुणे विभागातील ८३८ एसटी गाड्यांना व्हीटीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता घरी बसून गाडीची माहिती मिळेल. गाडीच्या चाैकशीसाठी बसस्थानकावर फोन करण्याची अथवा प्रत्यक्ष येण्याची गरज नाही.
-ज्ञानेश्वर रनवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, पुणे