--
महाळुंगे : रोज सकाळी आणि संध्याकाळी चाकण-तळेगाव रस्त्यावरील खराबवाडीकारांना रस्त्यावरील इतर गावांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. पण प्रशासन त्याविषयी जागरूक केव्हा होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
चाकण - तळेगाव रस्त्यावर खराबवाडी येथे
नागरिकांना सततची वाहतूककोंडी सहन करावी लागते आहे. गेली अनेक वर्षांपासून नेत्यांच्या आश्वासनाला बळी पडावे लागत आहे पण चाकण- तळेगाव रस्ता रुंदीकरणाला मुहूर्त काही मिळेना. ट्रॅफिकचा बोजवारा उडाल्याने रस्त्यावरील सुरक्षा नावापुरती राहिली असल्याचे चित्र आहे.
रस्तारुंदीकरण करणे खूप गरजेचे आहे. सारा सिटी तसेच काही ठिकाणी गावांत जाण्यासाठी रस्ता आहे तिथे उड्डाण पूल होणे आवश्यकता असून त्याकडे अद्याप लक्ष देण्यात आलेले नाही. औद्योगिक वसाहती मधील
मूळ समस्या सोडविण्यासाठीची कार्यवाही प्रशासनाकडून होत नसल्याचे दिसत आहे. खराबवाडी येथे सारा सिटी या सदनिके कडे जाणाऱ्या रस्त्यावर रोजच सकाळच्या व सायंकाळच्या वेळेस वाहतूककोंडी होते त्यातच तिथे रस्ता खोदला आहे त्यामुळे तर अजूनच अडचण निर्माण होते. त्यामुळे खराबवाडी कारांना खूप नाहक त्रास भोगावा लागत आहे. चाकण आणि परिसर मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकसित झाला आहे. तसेच अनेक नव्या इमारती, सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. वस्ती ते बंगले अशा सर्व आर्थिक उत्पन्न गटातील नागरिक या परिसरात राहातात. त्यामुळे या भागात ज्या नियोजनपूर्वक रस्त्यांची कामे व्हायला हवी होती, तशी ती झाल्याचे दिसून येत नाही. परिणामी नागरिकांना मूलभूत समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये जाणारे नोकरदार यांच्या वाहतूककोंडीच्या समस्येवर तातडीने मार्ग काढण्याची आवश्यकता आहे.नित्याची वाहतूककोंडीत काही वेळा छोटे मोठे अपघातही होतात.
खराबवाडी परिसरात पर्यायी रस्ते निर्माण झाले नाहीत. कामांसाठी रस्त्यांचे खोदकाम के ल्यानंतर रस्ते पूर्ववत करताना त्यावर खड्डे राहतात. अंतर्गत भागातील रस्ते अरुंद आहेत. अनेक ठिकाणी वाहनतळाचीही अडचण जाणवते. बऱ्याच ठिकाणी पार्किंगची आखणी नाही. पार्किंगलाही शिस्त नसल्याने वाहतुकीला अडथळा होतो. तसेच रस्त्याच्या कडेला टपऱ्या आणि अन्य व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे नीट चालताही येत नाही.
--
कोट
रोजच्या ट्रॅफिक जामने आम्ही सगळे नागरिक त्रस्त झालो आहोत काही काम अर्जंट निघाले तर लवकर गावाच्या बाहेर पडता येत नाही सारा सिटी रोडवर गाड्या वळतात त्यामुळे इथे खूप ट्रॅफिक होते या ठिकाणी सायंकाळी व सकाळी ट्रॅफिक विभागाचे अधिकारी हवेत त्यामुळे गाड्या शिस्त पाळतील त्यामुळे ट्राफिक कमी होण्यास मदत होईल.
- मनोज खराबी (पुणे जिल्हा उपाध्यक्ष म.न.से)
--
फोटो क्रमांक : ०३ महाळुंगे वाहतूक समस्या
फोटो ओळी : चाकण- तळेगाव रस्त्यावर खराबवाडी येथे झालेली वाहतूककोंडी