शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

समाजात कधी मिळणार आम्हाला समान हक्क? महिला वकिलांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 2:53 AM

विवाहबाह्य संबंधांसाठी स्त्री व पुरुष दोघांनाही जबाबदार धरण्यात यावे व त्यांना शिक्षेची तरतूद असावी, अशी मागणी करणारी याचिके सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. केंद्र सरकारने त्यास विरोध दर्शवला आहे.

पुणे : विवाहबाह्य संबंधांसाठी स्त्री व पुरुष दोघांनाही जबाबदार धरण्यात यावे व त्यांना शिक्षेची तरतूद असावी, अशी मागणी करणारी याचिके सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. केंद्र सरकारने त्यास विरोध दर्शवला आहे. सध्याच्या कायदेशीर तरतुदींनुसार विवाहबाह्य संबंधांच्या संदर्भात केवळ पुरुषाला शिक्षेची तरतूद आहे. तर याचिका मान्य केल्यास विवाह संस्थेचे पावित्र्य नष्ट होण्याचा धोका उत्पन्न होण्याची भीती सरकारने व्यक्त केली आहे.आजही महिलेला केवळ उपभोगाची वस्तू मानले जात आहे. कायद्यात समानतेची मागणी करण्यात येत असली तरी सामाजिक समानता आहे का, याचादेखील विचार व्हावा, अशी भावना या प्रकरणी पुण्यातील महिला वकिलांनी व्यक्त केली आहे.महिलेचे विवाहबाह्य संबंध तिच्या घरी समजले तर त्यांच्यात वाद होतात. त्यातून ते अगदी घटस्फोटापर्यंत जात असतात. त्यामुळे अशा संबंधांतून महिलेची फरपट होत नाही, असे नाही. तिलादेखील भोगावे लागते. विवाहबाह्य संबंध मान्य करण्याचे प्रमाण आपल्याकडे खूपच कमी आहे. आपली संस्कृती त्याला मान्यता देत नाही.- अ‍ॅड. प्रगती पाटील, उपाध्यक्षा,पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनबलात्कार पीडित महिलेला एखाद्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपीपेक्षाही जास्त रोष सोसावा लागतो. आजही समाजात महिलेला मानाचे स्थान नसून तिच्याकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. गुन्ह्यात नाहीत तर समाजात समाज महिलेला समान दर्जा द्यावा. या याचिकेनुसार महिलांवर देखील गुन्हा दाखल झाल्यास तिचे जगणे मुश्कील होऊन जाईल. त्यामुळे ही याचिका चुकीची आहे.- अ‍ॅड. वैशाली चांदणे, अध्यक्षा,दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनविवाहसंस्था टिकणे ही महिलेची देखील जबाबदारी आहे. त्याची काळजीत्या घेतात. पण पतीच्यासंमतीने स्थापन केलेले संबंधवैध व संमती नसतानाचे संबंध अवैध हे योग्य आहे का़, विवाहबाह्य संबंध स्थापन करून महिलेने पुरुषाची फसवणूक केली, असे प्रकारदेखील वाढत आहेत.त्यामुळे या प्रकरात महिलेलादेखील आरोपी केले पाहिजे. जीवनशैली बदलतेय, मात्र त्यात विवाहसंस्था टिकताहेत का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. सुप्रिया कोठारी,उपाध्यक्षा, फॅमिली कोर्टअ‍ॅडव्होकेट असोसिएशनस्त्रियांवर अत्याचार होण्याचा आलेख सध्या उंचावतच आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कायदा करण्याची ही योग्य वेळ नाही. आपला देश अजून तेवढा प्रगल्भ झालेला नाही किंवा आपली मानसिकतादेखील तशी नाही. स्त्री कितीही सक्षम असली तरी तिला इतर ठिकाणी समान हक्क मिळत नाही. याचिका मान्य झाल्यास अनेक कुटुंब तुटतील. कारण विवाहबाह्य संबंध कोणत्या कारणातून केले याचादेखील विचार व्हावा. तसेच ४९५ कलमानुसार दाखल झालेले गुन्हे सिद्ध करणे अवघड असतात. - अ‍ॅड. माधवी परदेशी

टॅग्स :WomenमहिलाPuneपुणे