शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

Sound System: कर्णकर्कश आवाज येतातच कुठून? हौशी व्यावसायिकांमुळे लागतेय सणाला गालबोट

By अतुल चिंचली | Published: August 23, 2024 1:05 PM

दहा वर्षांपूर्वीही साउंड लावले जात होते, तेव्हा असे कर्णकर्कश आवाज येत नव्हते, मागील चार-पाच वर्षांमध्ये हा बदल जाणवू लागलाय

पुणे: आम्ही पोटापाण्यासाठी व्यवसाय करतो; परंतु मागील काही वर्षांमध्ये काही लोक हौस म्हणून या व्यवसायात उतरले आहेत. त्यांच्याकडून नियम पायदळी तुडवले जात असल्याने सण-उत्सव, जयंतीला गालबोट लागत आहे. उत्सवाचा आनंद प्रत्येकाला घेता आलाच पाहिजे. त्याचवेळी त्याचा इतरांना त्रास हाेणार नाही, याची खबरदारी देखील घेतली पाहिजे. यादृष्टीने ठाेस उपाययाेजना करण्याकरिता प्रशासनाने आमच्यासोबत बैठक घ्यावी. आम्ही साउंडच्या बाबतीत सर्व टेक्निकल गोष्टींबाबत चर्चा करू, असे मत साउंड व्यावसायिकांनी ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केले आहे.

पुण्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून सण-उत्सव, जयंती साेहळ्यात कर्णकर्कश साउंड ऐकू येऊ लागला आहे. या आवाजाचा आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत असल्याने पुणेकर त्रस्त झाले आहेत. या आवाजाने काहींनी तर जीव गमावला. ही बाब विचारात घेऊन दहीहंडी आणि गणेशाेत्सव साेहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने साउंड व्यावसायिकांनी संवाद साधला असता व्यावसायिकांनी परखड भूमिका मांडली. कर्णकर्कश आवाज करण्याला आमचा देखील विरोध आहे, असे काही व्यावसायिकांनी सांगितले आहे.

आवाजाचे सीमाेल्लंघन

पुण्यात दहा वर्षांपूर्वीही साउंड लावले जात होते; पण तेव्हा असे कर्णकर्कश आवाज येत नव्हते. मागील चार-पाच वर्षांमध्ये हा बदल जाणवू लागला आहे. हे आवाज येतात कुठून?, त्यासाठी काय बदल केले जातात? याबाबतच्या काही गोष्टी प्रशासनाने जाणून घेतले पाहिजे. आम्ही त्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. पुणे शहरात २००० सालापासून साउंड असोसिएशन कार्यरत आहे. तेव्हापासूनच उत्सवांमध्ये साउंड लावले जात आहेत. पुण्यात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर याला मागणी असते. पूर्वी एका बॉक्समध्ये एकच स्पीकर लावला जात होता. मात्र कालांतराने कायद्याच्या धाकाने स्पीकरमध्ये बदल करण्यात आले. एकात २ स्पीकर अशी पद्धत सुरू झाली. तेसुद्धा भिंतीप्रमाणे उभे करू लागल्याने त्या स्पिकरचेही दणके बसू लागले. आता तर या साउंडच्या आवाजाने सीमा ओलांडल्याचे दिसून आले आहे. अक्षरशः लोकांचे जीव जाण्यापर्यंत या स्पीकरच्या भिंतींचा दणका वाढतो आहे. नक्की हा आवाज वाढतो तरी कुठून, असा सवाल सर्वत्र उपस्थित होत आहे.

प्रेशर मिड करतो बधिर

नव्या सिस्टीममध्ये प्रेशर मिड नावाचा प्रकार समोर आला आहे. एका बॉक्समध्ये १० पेक्षा जास्त हे प्रेशर मिड टाकले जातात. त्याने आपल्या कानाला असह्य आवाज निर्माण होतो. त्यामुळे तुम्हाला कायमचा बधिरपणा येऊ शकतो. मार्केटमध्ये हौशी व्यावसायिक स्पर्धा करण्यासाठी या प्रेशर मिडचा वापर करत असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. प्रेशर मिडचा वापर मध्यंतरीच्या काळातच मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जे पोटापाण्यासाठी व्यवसाय करत आहेत, ते या प्रकाराचा साउंड वापरत नाहीत. हाैशी व्यावसायिक याचा वापर करत असून प्रशासनाने हे जाणून घेऊन धाेरण आखणे आवश्यक आहे.

प्लाझा साउंड देतोय दणके

चार फुटांचे आणि ४८ बाय २४ इंचचे साउंड प्लाझ्मा म्हणून बाजारात सध्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये एका बॉक्समध्ये चार साउंड बसवले जातात. दणके देण्यासाठी या स्पीकरचा वापर होत असतो. पूर्वी एका बेसमध्ये एकच साउंड वापरला जात होता. म्हणजे ४ बेस लावले तरी एकच प्लाझ्मा लावल्यासारखे वाटत होते. आता मात्र स्पर्धा करण्यासाठी ४ प्लाझ्मा लावले जातात. त्यामुळे दणकेही जोरात बसू लागले आहेत. मंडळांची काही मागणी असली तरी निवडक व्यावसायिक मोठे साउंड लावण्याला विरोध करतात. परंतु पुणे शहराच्या बाहेरून आलेले व्यावसायिक बेधडकपणे हे घातक स्पीकर लावत आहेत.

आमचाही विरोधच

पुणे शहरात मध्यवर्ती भागात असणारी मंडळे सद्यस्थितीत कर्णकर्कश साउंडला विरोध करत आहेत. तसेच प्रोफेशनल स्पीकर या साउंडच्या विरोधातच आहेत. ज्यामधून आवाजाची क्वालिटी मेंटेन ठेवली जाते, अशाच साउंडला प्राधान्य दिले जात आहे. प्रेशर मिडला आमचाही विराेधच आहे. आम्हालाही त्याचा प्रचंड त्रास होत आहे, असे काही व्यावसायिक सांगत आहेत.

रिमिक्सचा खोडसाळपणा बंद करा

काही जण घरी बसून एखाद्या सॉफ्टवेअरवर साधे गाणे रिमिक्स करतात. गाण्याच्या मागे पुढे विचित्र हॉर्नचे आवाज सोडले जातात. त्यामुळे मूळ गाण्याची पूर्णपणे वाट लागते. ते गाणं साउंड सिस्टिमवर लावले असता जोरात आवाज येतो. तो आपल्या कोणाच्याही कानाला सहन होत नाही. तसेच मधूनमधून येणारे ते हॉर्नचे आवाज एक डोकेदुखीच होऊन जाते, असे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. अश्विनी येना... हे सुंदर गाणं अनेक स्पीकरवाले वाजवत आहेत. पण त्याची सुरुवातच इतकी जोरात होते की, गाणंच लोकांना वाईट वाटू लागतं. हा सगळा रिमिक्सचा खोडसाळपणा सर्वत्र बंद करावा, अशी मागणी काही व्यावसायिकांनी केली आहे.

आम्ही सुद्धा या हौशी साउंड व्यावसायिकांच्या विरोधात आहोत. ते बाहेरून येतात. एकमेकांशी स्पर्धा करायला ते या व्यवसायात उतरले आहेत. अनेक जण पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करतात. याबाबत आम्ही प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिले आहे. आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे की, कशामुळे त्रास होतो? कोणते साउंड लावावेत? याबाबत चर्चा करायची आहे. आमची बैठक घेतली तर या साउंडवर तोडगा निघेल. - बबलू रमझानी, अध्यक्ष, साउंड असोशिएशन, पुणे शहर

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdoctorडॉक्टरGaneshotsavगणेशोत्सवmusicसंगीत