पुणे: पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची वरात काढत पोलिसांनी यांना चांगलाच धडा शिकवला आहे. अक्षरशः गुडघ्यावर चालायला लावून ज्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली. त्याच ठिकाणी या आरोपींची धिंड काढण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांच्या या कामगिरीचे त्या भागातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे
दहशत माजवण्यासाठी मंगलमूर्ती सहकारी गृह रचना मर्यादित सोसायटीत २ जणांनी गाड्यांची तोडफोड केली होती. संबंधित प्रकाराची तक्रार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनल दाखल करण्यात आली होती. तक्रारीची तातडीने दखल घेत पोलिसांनी २ दिवसात आरोपींना अटक केली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कात्रज गुजरवाडी रोड येथील भारत नगर येथे लाईट नसल्याचा फायदा घेत अज्ञातांनी 10 वाहनांची तोडफोड केली होती. त्यांना धडा शिकवत पोलिसांनी त्याच भागात धिंड काढली.
विनाकारण होतीये तोडफोड दहशत माजवण्यासाठी पुणे शहरातील उपनगरात गाड्या तोडफोडीचे प्रमाण वाढू लागले आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खून, मारामाऱ्या, चोरी, स्त्रियांवरील अत्याचार यांचे प्रमाण वाढत असतानाच विनाकारक गाड्यांची तोडफोड वाढू लागली आहे. पोलिसांकडून आरोपींना धडा शिकवण्यासाठी रस्त्यांवरून धिंड काढली जात आहे. परंतु त्यांच्यावर पोलिसांचा धाक न राहिल्याचे दिसून लागले आहे. त्यामुळे या घटना वारंवार होत आहेत. आता या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हानच पोलिसांसमोर उभे राहिले आहे.