शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
3
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
4
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
5
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
6
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
7
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
8
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
9
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
10
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
11
शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच चिमुकली नतमस्तक, मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं होतंय कौतुक; पाहा व्हिडिओ
12
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
13
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
14
एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव
15
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
16
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
17
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?
18
Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...
19
"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला
20
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 शेअर्स...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा

चाकणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरून ८५ हजारांची लाच घेताना एकाला रंगेहाथ पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 4:07 PM

आरोपीने उपनिरीक्षक यांच्यासाठी ७० हजार तर स्वत:साठी १५ हजार रुपये, असे एकूण ८५ हजार रुपयांची लाच तक्रारदार तरुणाकडे मागितली.

चाकण : पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी ८५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेचाकण पोलीस ठाणे येथे बुधवारी (दि. २९) ही कारवाई केली. चाकण पोलीस ठाण्याच्या एका पोलीस उपनिरीक्षकाचाही याप्रकरणात समावेश असून त्यामुळे पिंपरी- चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अखत्तर शेखावत अली शेख (वय ३५), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रार तरुणाच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात तक्रार आली होती. त्यावरून कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ७० हजारांची लाच मागितली. त्यानुसार आरोपी शेख याने उपनिरीक्षक यांच्यासाठी ७० हजार तर स्वत:साठी १५ हजार रुपये, असे एकूण ८५ हजार रुपयांची लाच तक्रारदार तरुणाकडे मागितली. 

दरम्यान, तरुणाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून आरोपी शेख याला ८५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक क्रांती पवार तपास करीत आहेत.

टॅग्स :ChakanचाकणPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटक