पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात, काही वेळा थांबावे लागते : छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 08:12 PM2024-06-14T20:12:50+5:302024-06-14T20:15:01+5:30

पुणे : ‘माझ्या राजकीय आयुष्यात आतापर्यंत अनेक गोष्टी घडल्या आहेत. शिवसेना पक्ष जेवढ्या वर्षांचा आहे, तेवढे माझे वय आहे. ...

While working in the party, not everything goes according to plan, sometimes you have to stop: Chhagan Bhujbal | पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात, काही वेळा थांबावे लागते : छगन भुजबळ

पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात, काही वेळा थांबावे लागते : छगन भुजबळ

पुणे : ‘माझ्या राजकीय आयुष्यात आतापर्यंत अनेक गोष्टी घडल्या आहेत. शिवसेना पक्ष जेवढ्या वर्षांचा आहे, तेवढे माझे वय आहे. त्यामुळे पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. काही वेळा थांबावे लागते,’ असे सूचक वक्तव्य अन्न व नागरी पुरवठामंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले.

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भिडेवाडा स्मारकाची पाहणी केत्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “राज्यसभेच्या जागेसाठीदेखील पक्षांतर्गत अनेक बैठका झाल्या. त्यात सुनेत्रा पवार यांचे नाव जाहीर झाले. माझी खासदार होण्याची इच्छा आहेच. विरोधक चुकीच्या बातम्या माध्यमांतून पेरत आहेत. अनेक वेळा अशा गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या आहेत; परंतु ज्या त्या गोष्टी वेळेवर सोडून देत पुढे जावे लागते, त्यानुसार माझा प्रवास झाला आहे. मला खासदारकीची संधी दिली नाही, म्हणून त्याचा अर्थ मी नाराज आहे असा नाही.”

भिडे वाडा स्मारकासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढलो; पण त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. दोन-अडीच महिने आचारसंहिता आणि निवडणुकीत गेले. याठिकाणी बालसंगोपन केंद्र, तसेच विहीर आहे. या ठिकाणी ५०० लोकदेखील बसू शकत नाहीत. त्यामुळे जवळची जागा मोकळी करावी आणि ३०० मीटरवर असलेले सावित्रीबाईंचे स्मारक जोडण्यात यावे, यासाठी प्रयत्न करत आहे; पण यात काही प्रगती होत नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: While working in the party, not everything goes according to plan, sometimes you have to stop: Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.