शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
2
अजितदादा काँग्रेसला धक्का देणार?; ४ आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
3
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
4
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
5
Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
6
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
7
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
8
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
9
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
10
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
11
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
12
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
13
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
14
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
15
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी
16
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
17
'शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे मिक्स विचार', इकडे हिंदूत्वाचा विचार';गुलाबराव पाटलांचा पलटवार
18
शेअर बाजारात गुंतवणूकीचं टेन्शन येतं, मग 'हे' सुरक्षित पर्याय आहेत की; मॅच्युरिटीवर मिळणार जबरदस्त रिटर्न
19
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
20
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल

‘व्हेजिटेबल ट्रान्स प्लान्टनर’

By admin | Published: July 07, 2015 5:13 AM

बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंतर पीक व मुख्य पीक पेरणी व लागवडीसाठी आधुनिक उपकरण विकसित केले आहे.

विनोद पवार, मोरगावबारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंतर पीक व मुख्य पीक पेरणी व लागवडीसाठी आधुनिक उपकरण विकसित केले आहे. यामुळे लाखांची किंमत आता माफक झाली आहे. कमी खर्चात या यंत्राची निर्मिती झाल्यास शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. परदेशी यंत्राच्या तुलनेत हे केवळ काही हजारांच्या किमतीमध्ये तयार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे मजूर टंचाईवर आता सक्षम पर्याय मिळाला आहे. बीजपेरणीसह, रोपांची आंतरपिकांची लागवड अधिक जलद गतीने होणार आहे. तर उत्पादन खर्चात देखील बचत होणार आहे.विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी शेतामध्ये पेरणीसह पालेभाज्या लागवडीचे संयुक्त ‘व्हेजिटेबल ट्रान्स प्लान्टनर’ नावाने हे मॉडेल विकसित केले आहे. जर्मनी, इटली या देशांनी निर्मिती केलेली अवजारे सध्या मोठ्या शेतकऱ्यांच्या सोईसाठी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात भाडेतत्त्वावर दिली जातात. मात्र, याची किंमत ८ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे ते विकत घेणे शेतकऱ्यांना शक्य नाही. याबाबतचा विचार करून अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे आधुनिक उपकरण विकसित केले आहे. याद्वारे ऊस, कांदा, बटाटा, पालेभाज्या त्याचबरोबर बियाणांची ही पेरणी एकाच वेळेस करता येते. तीन फुट उंच व चार फुट लांब हे मशीन आहे. हे उपकरण हाताद्वारे अथवा ट्रॅक्टरद्वारे सहज चालवणे शक्य आहे. सध्या या उपकरणाच्या निर्मितीसाठी अंदाजे ३० ते ४० हजार रुपये खर्च येणे अपेक्षित असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. या निर्मितीत परदेशी उपकरणाच्या तुलनेत लागवड व पेरणी पद्धतीचा बदल सहजगत्या करण्याच्या दृष्टीने पर्याय निर्माण केलेले आहेत. यातील सुधारित संशोधन झाल्यास नव्याने काही बदल सहज व सुलभ आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे उपकरण अधिक फायद्याचे आहे. या यंत्राच्या निर्मितीसाठी कॉलेजचे विद्यार्थी महेश गायकवाड, नीलम कारंडे, प्रशांती ढवाण, तेजस्वी मोझे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर संस्थेचे प्रा. एस. व्ही शेळके, एच. पी. बोराटे यांनी मार्गदर्शन केले.