शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला ?

By admin | Published: April 15, 2015 11:10 PM

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे आज ४३ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.

सोमेश्वरनगर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे आज ४३ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. कार्यक्षेत्रातील ५३ मतदान केंद्रावर ९१.५१ टक्के सरासरी मतदान झाले. संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली़ मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतांचा टक्का वाढल्याने त्याचा नेमका कोणाला फायदा होणार, याची चर्चा आहे. आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली़ त्याअगोदरपासून मतदान केंद्रावर सभासदांनी गर्दी केली होती़ सकाळपासूनच केंद्रांवर रांगा लागल्याचे दृश्य दिसत होते़ दोन्ही पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न केले. बाहेरगावच्या मतदारांना बोलावून घेतले होते. तसेच प्रत्येक गावांमधून मतदारांसाठी मतदानाला आणण्यासाठी गाडयांची सोय करण्यात आली होती. सकाळी १० नंतर मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी गर्दी झाली होती. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा या पंचवार्षिकला मतदान प्रक्रिया पटपट उरकत होती. सकाळी ११ वाजेपर्यंतच ५० टक्क्यांवर मतदान गेले होते. तर दुपारी ३ वाजेपर्यंत ते ७० ते ७५ टक्क्यांवर गेले होते. वाघळवाडी या ठिकाणी तर दुपारी ४ वाजताच मतदान पूर्ण झाले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर अनेक मतदान केंद्रावरील मतदान पूर्ण झाले होते. सकाळपासूनच सोमेश्वरनगर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने कार्यक्षेत्रात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनल व शेतकरी कृती समिती सोमेश्वर जनशक्ती पॅनल हे दोन पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. १ ते १३ एप्रिल दरम्यान प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. सांगता सभेची दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना लक्ष्य करत प्रचाराची सांगता झाली. दि. १४ रोजी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिवसभर आणि रात्रभर गाठीभेटीवर भर दिला होता. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. ९ एप्रिलपासून सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तळ ठोकून तब्बल ९ सभा घेतल्या. शेतकरी कृती समितीच्या प्रचारालाही राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, माळेगाव मध्ये परिवर्तन घडवून आणणारे सहकारतज्ञ चंदरराव तावरे व रंजन तावरे यांनीही तळ ठोकला होता. (वार्ताहर)सुपे : सोमेश्वर निवडणुकीत सुपे येथील चुरशीच्या या लढतीत एकुण ९४.८७ टक्के मतदान झाले. येथील केंद्रावर दुपारी किरकोळ झालेली बाचाबाची वगळता शांततेत मतदान झाले. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दोन केंद्रांवरील ५२७ मतदारांपैकी एकुन ५०० मतदारांनी आपला हक्क बजावला. सुपे येथील केंद्र क्रमांक ३९ मध्ये दुपारी एक वाजेपर्यंत २७३ मतदारांपैकी १३८ मतदारांनी आपला हक्क बजावला. बुधवारी (दि.१५) येथील आठवडे बाजार असल्याने सुपे पंचक्रोशीतील मतदारांनी गर्दी केली होती. त्यामुळे मतदारांनी दुपारी रांगा लावुन मतदान केल्याची माहिती केंद्राध्यक्ष एस. के. डिंबळे यांनी दिली. सायंकाळी सहा वाजेतर्यत ९४.१३ टक्के मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले. येथील केंद्र क्रमांक ४० या ठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत २५४ मतदारांपैकी १३० मतदारांनी आपला हक्क बजावला.या केंद्रांवर ५१.८१ टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती केंद्राध्यक्ष एन. व्ही. काळे यांनी दिली. त्यानंतर सहा वाजेपर्यंत ९५.६६ टक्के मतदानाची नोंद झाल्याचे काळे यांनी सांगितले. गट क्र.१ : ३२७२ / ३०१८ (९२.२३)गट क्र २ : ३२०१/ २९५३ ( ९२.२५)गट क्र ३ : ३२५३/ २९२२ (८९.८२ )गट क्र ४ : ३१२२ / २९२२ (९३.२०) गट क्र. ५: ३३८१ / ३०४९(९०.१८)‘ब’ वर्ग : १३३ /१३३ (१०० )५७.१८ टक्केभोर : राजगड सहकारी साखर कारखान्याच्या १० जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत सरासरी ५७.१८ टक्के मतदान झाले. ७,५४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भोर केंद्रावर सर्वाधिक ८८.९७ टक्के, तर सर्वांत कमी वेल्हे केंद्रावर ३७.२५ टक्के मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार न घडता सर्वच्या सर्व ३० मतदान केंद्रांवर अत्यंत शांततेत मतदान पार पडले. कारखान्याच्या एकूण १७ जागांपैकी ७ जागा अगोदरच बिनविरोध झाल्या असून, निवडणूक झालेल्या १० जागांसाठी १७ गावांत भोर तालुक्यात २०, वेल्हे ५, खंडाळा ३ व हवेलीत २ अशा ३० मतदान कें द्रांवर आज ५७.१८ टक्के मतदान झाले. १३,१८९ मतदारांपैकी ७,५४१ मतदारांनी मतदान केले. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरवात झाली. १० वाजता सर्व मतदान केंद्रांवर ११.१८ टक्के, १२ वाजता २७.९९ टक्के, २ वाजता ४३.२६ टक्के तर ५ वाजता ५७.१८ टक्के मतदान झाले. सकाळी संथ गतीने मतदानाला सुरुवात झाली. मात्र, दुपारी २ नंतर मतदानाचा वेग वाढायला सुरुवात झाली. आमदार संग्राम थोपटे यांनी भोर शहरातील मतदान केंद्रावर मतदान केले.भोर शहर व आसपासच्या आंबेघर, भोलावडे, खानापूर या ७ मतदान केंद्रांवर काँग्रेस वगळता सेना-भाजपासह इतर कोणत्याच पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली राजगड सहकार पॅनल सर्वच्या सर्व १० जागा लढवत असून सेना-भाजपाने सर्वपक्षीय राजगड परिवर्तन पॅनल उभे केले आहे. ते ९ जागा लढवत आहेत. या दोघांतच खरी लढत होत आहे, तर राष्ट्रवादीचे ६ अर्ज राहिले होते. मात्र, ते पॅनल करून निवडणूक लढवत नसल्याने वेल्हे तालुक्यातील ३ उमेदवार परिवर्तन पॅनेलकडून निवडणूकलढवत होते, तर राष्ट्रवादीचे काही जण वैयक्तिक प्रचार करीत होते. दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा केला असला, तरी थोपटे यांच्या पॅनलचे ७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने कारखाना ताब्यात घेण्यासाठी त्यांना केवळ २ जागांची गरज आहे. (वार्ताहर)भोर : ७९.५८ खानापूर : ८०खानापूर ५९.९१ भोलावडे : ७१.४९आंबेघर : ५५.६२आंबेघर : ४९किकवी : ५६.२४ किकवी : ६७.८०आळंदे : ६१.८४आळंदे : ४३.४०आळंदे : ५९.५८भादे : ४८.१३ भादे : ६१.१९शिरवळ : ५८.३७ सारोळे : ५४.०३ सारोळे : ५५.६१न्हावी : ७०.१३ न्हावी : ६२.३५ कापूरव्होळ : ३७नसरापूर : ५५.५८नसरापूर : ४७.७८खेड-शिवापूर : ४३खेड-शिवापूर : ४२पानशेत : ४९.१९वेल्हे : ४२.९७वेल्हे : ३७.२५ मार्गासनी : ५८.५८मार्गासनी : ५६.६४दापोडे : ६२.१४ भोर : ८८.९७