पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डीआरडीओ मधील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. पुण्याचाच रहिवासी असलेल्या कुरुलकरच्या विरोधात आता जनमत प्रक्षुब्ध होऊ लागले आहे. राजकीय पक्षांनीही त्यात सहभागी धार्मिक होत आहे. देशप्रेमाचे धडे देणाऱ्या संघटनेत अशी देशद्रोही क्रुत्ये करणारे असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून संघावरही टीका केली जात असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.
डॉ कुरुलकर याला आय एस आय या पाकिस्तानी लष्करी संघटनेसाठी हेरगिरी करताना पोलिसांनी पुण्यात पकडला आहे. त्याने आजपर्यंत पाकिस्तानी संघटना (आय एस आय) ISI ला काय गोपनीय माहिती पुरवली आणि देशाचं किती नुकसान केलंय, याचीही चौकशी व्हावी या मागणीकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बालगंघर्व चौक येथे करण्यात आलेल्या निदर्शनात अनेक स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते. यावेळी निषेधाच्या घोषणा झाल्या.
माझ्या चार पिढ्या संघाचे काम करीत आहेत व माझ्यावर संघाचे संस्कार आहे. मी आर एस एस चा शाखा प्रमुख असून त्याकरीता कार्य करत असल्याचे डॉ. कुरूलकर अभिमानाने सांगतानाचे व्हीडीओ क्लिप प्रसार माध्यमांमघ्ये पहायला मिळत आहेत , ज्या संघटनेच्या स्वयंसेवकाला देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक केली त्या संघटनेने आता मात्र त्याचा आमचा काही संबध नाही असे जाहीर केले. या सर्व प्रकाराची कसून चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हीच व्यक्ती इतर कोणत्याही समाजातील असती किंवा अन्य कोणत्याही सरकारने ही कारवाई केली असती तर याच मंडळीनी संपूर्ण भारतात आरडाओरडा केला असता अशी टीका करण्यात आली. भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान चा एजंट कोण? संघ स्वयंसेवक अशा घोषणा देण्यात आल्या. शहराघ्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमूख , विनोद पवार, बाबा पाटील, सुवर्णा माने , प्रदीप हुमे , वंदना साळवी , सुनिल पडवळ , विशाल गद्रे , राहूल तांबे आंदोलनात सहभागी झाले होते.