पुणे : गँगस्टर शरद माेहोळ याचा खून केल्याप्रकरणातील मास्टर माईंड चा चेहरा समोर आणण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. मुळशी तालुक्यातील गुंड विठ्ठल शेलार सह ११ जणांना पोलिसांनी पकडले. विठ्ठल शेलार याने पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याची पक्षाच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
गणेश मारणे टोळीचा सदस्य असलेला विठ्ठल शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही झाली होती. २०१७ मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने भाजपात प्रवेश केला. मात्र, त्याला पक्षात फारसे स्थान मिळले नाही.
शरद मोहोळ याचे वर्चस्व मुळशी व परिसरात वाढले होते. कंपन्यांमधील कंत्राटे घेण्यावरुन त्यांच्यात कुरुबुरी सुरु होत्या. काही महिन्यांपूर्वी मुंबई बंगलुरु महामार्गावरील राधा हॉटेल चौकात त्याने गोळीबार ही केला होता. विठ्ठल शेलार हा सुरुवातीपासून पोलिसांच्या रडारवर होता. शरद मोहोळचा खून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो गुन्हे शाखेत हजर झाला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. त्याला पहाटे पनवेलहून ताब्यात घेतले आहे.