शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

...या पुअर शोला जबाबदार कोण?

By admin | Published: April 12, 2017 4:05 AM

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागाच्या मोशी, प्राधिकरण येथील वसतिगृहाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी

पिंपरी : महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागाच्या मोशी, प्राधिकरण येथील वसतिगृहाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी आयोजकांना मंत्र्यांनी कानपिचक्या दिल्या. ‘मागासवर्गीयांची मुले शिकावीत, पुढे जावीत म्हणून त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतो, वसतिगृह उभारतो, उद्घाटनाला मोठ्या नेत्यांना बोलवितो आणि एवढे करून कार्यक्रमाला लोकच नाहीत. त्यातूनच आमच्या सामाजिक न्याय विभागाचा मागासलेपणा दिसून येतो. माणसे जमा करता येत नाहीत, तर या पुअर शोला जबाबदार कोण, असा सवाल बडोले यांनी केला. महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागातर्फे मोशी, प्राधिकरण येथे उभारण्यात आलेल्या अडीचशे विद्यार्थी क्षमता असलेल्या मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, क्रेडाईचे अनिल फरांदे आदी उपस्थित होते.बडोले म्हणाले, ‘‘गरीब, मागासवर्गीय माणसांना मोजता येणार नाही, एवढे करोडो रुपये खर्चून त्यांच्या मुलांसाठी सामाजिक विभाग विविध सोयी, सुविधा देत आले आहे. पण, त्याचे म्हणावे तितके मार्केटिंग झाले नाही. वसतिगृहाच्या उद्घाटनाला मंत्री, आमदार, महापौरांना बोलावितो. मात्र, लोकच नाहीत. हा आमच्या विभागाचाच मागासलेपणा आहे. निदान विद्यार्थ्यांना तरी बोलवायला हवे.’’प्रादेशिक आयुक्त ए. बी. महाजन यांनी प्रास्ताविक केले. माया ननावरे यांनी सूत्रसंचालन केले. अतिरिक्त आयुक्त सदानंद पाटील यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)- बडोले म्हणाले, ‘‘बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ५० स्मृतिस्थळांचा विकास करणार असून, त्यातील २८ स्थळांचा विकास सुरू आहे. त्याचप्रमाणे निवडक दलित वस्त्यांचाही विकास करण्यात येणार आहे.’’