शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘सोमेश्वर’ची कृपा कोणावर होणार?

By admin | Published: April 16, 2015 11:01 PM

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्याला चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी पुन्हा तडा दिला.

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्याला चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी पुन्हा तडा दिला. त्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूकदेखील अजित पवार यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. मागील निवडणुकीपेक्षा शेवटच्या टप्प्यात १० ते १२ टक्के जास्त झालेले मतदान ‘राष्ट्रवादी’ पुरस्कृत पॅनलला धडकी भरविणारे आहे, अशी चर्चा होती. यंदाची निवडणूक काकडे गटासाठी महत्त्वाची ठरली आहे. सर्व काकडे कुटुंब या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याने निवडणुकीतील चुरस वाढली. राष्ट्रवादीच्या पॅनलला कडवे आव्हान उभे केले आहे. बारामती, लोणंद, खंडाळा व पुरंदर या तालुक्यांतील जिरायती भाग असे मोठे कार्यक्षेत्र असलेला सोमेश्वर कारखाना कथित गैरव्यवहार प्रकरणामुळे गाजला. या गैरव्यवहाराभोवतीच कारखान्याचा प्रचार झाला. त्याबरोबर खासगी कारखान्यांना अजित पवार यांनी प्रोत्साहन दिल्याने सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आली आहे, असा प्रचाराचा रोख काकडे यांचा होता. त्याला प्रत्युत्तर देत असताना बारामतीत कारखानदारी येणार नाही, याबाबत अजित पवार यांना सातत्याने सांगावे लागले. प्रत्येक निवडणुकीला काकडे कुटुंबातील कोणी तरी महत्त्वाचा नेता पवार यांच्यासोबत असतो. या निवडणुकीत मात्र काकडे कुटुंब एकवटले. मोठे कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वरच्या निवडणुकीत १६ हजार ३६८ पैकी १४ हजार ९८९ ऊसउत्पादक मतदारांनी मतदान केले. मतांची टक्केवारी ९१.५८ टक्के होती. विक्रमी मतदान झाले. माळेगाव कारखान्याची सत्ता गेल्यानंतर ‘सोमेश्वर’साठी अजित पवार यांनी स्वत: विशेष लक्ष दिले आहे. त्यांंनी तब्बल ५ ते ६ दिवस तळ ठोकून कार्यक्षेत्र पिंजून काढले आहे. १९९२ पर्यंत काकडे कुटुंबांची सत्ता ‘सोमेश्वर’ कारखान्यावर होती. त्यानंतर पवारांच्या पॅनलने आतापर्यंत सत्ता मिळविली. मागील दोन-तीन वर्षांच्या काळातील कथित गैरव्यवहार प्रकरण, आर्थिक घोटाळे, कारखान्यावरील कर्जाचा डोंगर आदी कारणांमुळे अपेक्षित दर ऊसउत्पादकांना मिळाला नाही. त्याची नाराजीदेखील या निवडणुकीत होती. सत्ताधाऱ्यांवर नाराजी असली, तरी सतीश काकडे, प्रमोद काकडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला प्रचार काळात नियोजनाचा अभाव दिसून आला. मात्र, खासदार राजू शेट्टी, आमदार महादेव जानकर, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे या सहकार चळवळीतील नेत्यांनीदेखील ‘माळेगाव’प्रमाणे ‘सोमेश्वर’ची सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मागील ७ वर्षांत ऊसदरासाठी सातत्याने सतीश काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आक्रमक आंदोलन त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. शहाजी काकडे यांच्या पवारविरोधी भूमिकेचा फायदा सतीश काकडे यांच्या पॅनलला होणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा केला जात असला, तरी क्रॉस वोटिंगचा फटका बसणार असल्याचे चित्र आहे. अगदी शेवटच्या अर्धा तासात मतांची टक्केवारी वाढली. मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी आले होते. बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी हा या कारखान्याचा मतदार आहेत. सुरुवातीच्या काळात या भागातील शेतकऱ्यांना सभासद करण्यात आले होते. जिरायती भागातील मतदारांचा प्रभाव कारखान्याच्या निवडणुकीत पडतो, हेदेखील आजवर स्पष्ट झाले आहे. पवार यांनी तब्बल १९ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे जुन्यांची नाराजी कायम होती. त्याचबरोबर, काकडे गटाने तोडीस तोड उमेदवार रिंगणात उतरविले. आता बदललेल्या सत्ताकेंद्रांमुळे ‘माळेगाव’ची पुनरावृत्ती ‘सोमेश्वर’ला होईल का, हे मतमोजणीत स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)४सतीश काकडे, चंद्रराव तावरे यांनी ‘सोमेश्वर’चे खासगीकरण करण्याची भीती व्यक्त केली. कारखाने अडचणीत आणून त्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटाच लावला असल्याचा आरोप प्रचारात काकडे, तावरे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी तालुक्यात खासगी कारखाने येणार नाहीत, अशी ग्वाही दिली; परंतु तालुक्यातून खासगी कारखान्यांना ऊस नेला जातो, यावर मात्र त्यांना उत्तर देता आले नाही. या निवडणुकीत स्थानिक गटबाजी, नाराजी, नातीगोती आदींचा प्रभाव दिसून आला. शेवटच्या टप्प्यात अगदी काही उमेदवारांनी स्वत:साठी मत मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे माळेगावप्रमाणेच ‘क्रॉस’ वोटिंगचा फटका कोणाला बसणार, हेदेखील शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होईल.