कोण होणार शहराध्यक्ष : राष्ट्रवादीत वाढली चलबिचल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 08:45 PM2018-07-03T20:45:33+5:302018-07-03T20:49:25+5:30

उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार असल्याने त्यानंतर नाव जाहीर केले जाईल अशीही चर्चा सुरु झाली आहे. 

Who will be the NCP's new president of city | कोण होणार शहराध्यक्ष : राष्ट्रवादीत वाढली चलबिचल 

कोण होणार शहराध्यक्ष : राष्ट्रवादीत वाढली चलबिचल 

googlenewsNext

पुणे : शहरात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या  शहराध्यक्षपदावर अजूनही निर्णय घेतला जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची चलबिचल सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार असल्याने त्यानंतर नाव जाहीर केले जाईल अशीही चर्चा सुरु झाली आहे. 

       यापूर्वी खासदार वंदना चव्हाण यांनी सुमारे ९ स्पर्श शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्याकाळात पक्षाने लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे चव्हाण यांच्या कार्यकाळात झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाचा आलेख खालावला असला तरी पक्षपातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे.  मात्र दुसऱ्यांदा खासदारकी मिळाल्यावर त्यांच्याऐवजी इतरांना संधी मिळावी हा जोर वाढला असून अध्यक्षबदल अटळ मानण्यात येत आहे. 

     सुरुवातीला चव्हाण यांच्याऐवजी माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र मानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांचा पत्ता कट झाल्यात जमा आहे. त्यांच्यासोबत माजी महापौर प्रशांत जगताप, सुभाष जगताप आणि चेतन तुपे यांचीही नावे चर्चेत आहेत. यातील सुभाष जगताप सोलापूरमधील मोहोळमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठीची तयारीही त्यांनी सुरु केली आहे. या जागेसाठी त्यांची पक्षाने निवड केली असेल तर शहरध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्यात येणार नाही. त्यामुळे प्रशांत जगताप आणि तुपे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. तरुण आणि अनुभवी मतदारांना आकर्षित करणारी भाषाशैली, आक्रमक आणि मुद्देसूद भाषणे, सुसंस्कृत व्यक्तिमत्व असे निकष लावले असता या दोघांमध्ये अधिक स्पर्धा असल्याचे मानण्यात येते. मात्र यांच्या व्यतिरिक्त वेगळा विचारही नाकारता येत नाही. त्याकरिता विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे यांचाही विचार होऊ शकतो.  

       अजित पवार यांनी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहराध्यक्ष निवडण्यात येईल असे संकेत यापूर्वी दिले होते. आज अधिवेशनाला रवाना होण्यापूर्वी पवार यांनी पुण्यातील कार्यक्रम उरकले होते. त्यामुळे त्यातल्या एखाद्या ठिकाणी ते नाव जाहीर करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण तीही फोल ठरली. त्यामुळे आता शहराध्यक्ष कधी ठरणार या प्रश्नाचे उत्तर स्वतः अजित पवार वगळता कोणीही देऊ शकणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Web Title: Who will be the NCP's new president of city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.