शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

कोण होणार प्रदेशाध्यक्ष : पुण्यात राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरुवात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:27 AM

राज्यातील महत्वाचा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची निवड आज  होणार आहे.याबाबत राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बैठकीनंतरच्या सभेत नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर करणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याने त्यानिवडीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात : काही तासात होणार प्रदेशाध्यक्षाची निवड शरद पवार यांच्यासह राज्यभरातील महत्वाचे नेते उपस्थित

पुणे :  राज्यातील महत्वाचा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची निवड आज  होणार आहे. या पदासाठी अनेक नावे चर्चेत असून आज दुपारी त्यावर शिक्कमोर्तब होणार आहे.  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याने त्यानिवडीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याबाबत राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बैठकीनंतरच्या सभेत नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर करणार आहेत. या बैठकीला पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, जयंत पाटील, चित्रा वाघ. सुनील तटकरे, अनिल देशमुख आदींसह विविध भागातील नेते उपस्थित आहेत. दिलीप वळसे पाटील निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून काम बघणार आहेत. 

 

       सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा तीन वर्षांचा कालावधी यापूर्वीच संपुष्टात आला आहे.मात्र  पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनामुळे निवड करण्यास काहीसा विलंब झाला आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच दबदबा निर्माण  केला आहे. विशेषतः नुकत्याच करण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनात त्यांनी संपूर्ण राज्यात फिरून पक्षाची ताकद आजमावली आहे.शिवाय सोशल मिडिया किंवा प्रत्यक्षातही राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधातल्या प्रत्येक मुदद्यावर बोट ठेवत आहे. ग्रामीण भागासह शहरातही त्यांचे लक्ष असून तिथेही कार्यकर्त्यांना आक्रमक राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागाशी जोडलेला पण सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहऱ्याची पक्षाला गरज आहे. 

 

       अशावेळी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे अशी दोन नावे पुढे येत असून त्यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे. सध्या मुंडे यांना प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर हल्लाबोल सभेतील त्यांच्या भाषणांना तसेच सोशल मिडियावरही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच जातीय समीकरणे जुळवण्यासाठी आणि ओबीसी मतपेटीसाठीही त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.दुसरीकडे पाटील हे पक्षात अनुभवी असून त्यांचा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव जास्त आहे.त्यामुळे त्यांचाही पर्याय खुला आहे.याशिवायही काही नावे डोळ्यासमोर असून शरद पवार हे स्वतःच अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  याशिवाय अनेक ठिकाणचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षही या बैठकींनंतर जाहीर होणार आहे. मात्र त्यात पुणे आणि सध्या धगधगणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नसल्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे