Supriya Sule : अजित पवारांविरोधात कुणाला उमेदवारी देणार? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 04:54 PM2024-09-11T16:54:15+5:302024-09-11T16:55:00+5:30

Supriya Sule : विधानसभा निवडणुकांची काही दिवसातच घोषणा होऊ शकते, राजकीय पक्षांनी जागावाटपाची चर्चा सुरू केल्या आहेत.

Who will be nominated against Ajit Pawar? Supriya Sule gave the answer in one sentence | Supriya Sule : अजित पवारांविरोधात कुणाला उमेदवारी देणार? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात दिलं उत्तर

Supriya Sule : अजित पवारांविरोधात कुणाला उमेदवारी देणार? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात दिलं उत्तर

Supriya Sule ( Marathi News ) :राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार असून सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यामुळे दोन गट पडले आहेत, आता विधानसभा निवडणुकीत दोन्ही गट आमने-सामने दिसणार आहेत, निवडणुकीत बारामती विधानसभेत शरद पवार गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार, या चर्चा सुरू आहेत. यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. 

"बारामती विधानसभेची जागा  कुणाला मिळणार हे अजूनही नक्की नाही. याची मला माहिती नाही, अशी माहिती आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'गणेशोत्सवानंतर महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत बैठक होणार आहे.या बैठकीत जर ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर या जागेवर कुणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरवले, असंही सुळे म्हणाल्या.

सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला ब्रेक; शक्तीपीठनंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं काम थांबवलं

'मणिपूर प्रकरणात केंद्र सरकार फेल '  

मणिपूर प्रकरणात केंद्र सरकार फेल आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी तिकडे जावे. मणिपूरमधील घटनेवर राजकारण करु नये. आपण, सगळ्यांनी देशाच्या हितीची काम केली पाहिजेत. म्हणून मणिपूर शांत व्हावे, म्हणून आम्ही सगळ्यांनी विनंती केली होती. पण सातत्याने मणिपूरमध्ये हिंसा थांबत नाही, असंही सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्रात क्राइम वाढला

गेल्या काही दिवसापासून हिट अँड रनच्या घटना वाढल्या आहेत. महाराष्ट्रात क्राइमही वाढला आहे, महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत. केंद्र सरकारच्या डेटातून समोर येते की, महाराष्ट्रात क्राइम वाढले आहेत. ट्रिपल इंजिन सरकार यात अपयशी ठरले आहे, असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे लगावला.

"मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना सुळे म्हणाल्या, सातत्याने भाजपाकडून इतिहास बदलण्याचे काम सुरू आहे. आधी देवेंद्र फडणवीस यांनी सुरतबद्दल विधान केले होते. भाजपाकडून हा प्रकार सुरू केला आहे, आम्ही हा चुकीचा इतिहास मांडू देणार नाही. आम्ही नेहमी विरोध करणार, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Web Title: Who will be nominated against Ajit Pawar? Supriya Sule gave the answer in one sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.