ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार.. शिवसेना राष्ट्रवादी अन् काँग्रेसच्या वर; संजय राऊतांनी डिवचलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 06:11 PM2021-09-04T18:11:35+5:302021-09-04T18:16:18+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या खेड, जुन्नर आणि शिरूर मतदारसंघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा 'पॉवर' दाखवत राष्ट्रवादीला डिवचलं आहे. 

Whose Chief Minister, his government .. Shivsena above NCP and Congress; Sanjay Raut | ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार.. शिवसेना राष्ट्रवादी अन् काँग्रेसच्या वर; संजय राऊतांनी डिवचलं 

ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार.. शिवसेना राष्ट्रवादी अन् काँग्रेसच्या वर; संजय राऊतांनी डिवचलं 

googlenewsNext

पुणे : भाजपसोबत काडीमोड घेत शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आणलं. मात्र, पहिल्या दिवसापासून या तीन घटक पक्षांतली कुरघोडी लपून राहिलेली नाही.त्यात खेड तालुक्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतुन विस्तव देखील जायला तयार नाही. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या खेड, जुन्नर आणि शिरूर मतदारसंघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा 'पॉवर' दाखवत राष्ट्रवादीला डिवचलं आहे. 

शिवसेना नेते खासदार संजय राऊत शनिवारी ( दि. ४) पुणे दौऱ्यावर आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचं खेड-शिरुरमध्ये शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं. याचवेळी राऊतांनी सुद्धा शिवसैनिकांमध्ये एकप्रकारे चैतन्य फुलवितानाच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात धुवांधार बॅटिंग केली. यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, राज्यात जरी तीन पक्षाचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांचंच सरकार असतं. त्यामुळे सरकार आपलं आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्यावर आहे. ही आपली पॉवर आहे. त्याचवेळी दुसरीकडे शरद पवार आपले आहेत. तसेच अजित पवार देखील आपलेच आहेत. दिलीप वळसे गृहमंत्री असतील, मात्र, शिवसेना सगळ्यांच्यावर आहे असेही ते म्हणाले. 


शिरूर आणि जुन्नर मध्ये शिवसेनेचा भगवाच फडकणार : संजय राऊतांचा विश्वास 

शिरुर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा गड होता. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तिथूनच खासदारकीची हॅट्रिक केली. पण मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खेड, शिरुर आणि जुन्न्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार येथे विजयी झाले. मात्र आता राऊत यांनी थेट शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना आव्हान देतानाच शिवसैनिकांनो, आजपासूनच कामाला लागा. कारण शिरुर, खेड, जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकणार आहे असा आत्मविश्वास देखील व्यक्त केला.
 

Web Title: Whose Chief Minister, his government .. Shivsena above NCP and Congress; Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.