शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

नामांकित महाविद्यालयांचाच शिष्यवृत्तीसाठी विचार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:37 PM

समाज कल्याणने सिंहगड इन्स्टिट्यूटचेच नाही तर पुण्यातील अनेक शिक्षण संस्थांच्या शिष्यवृत्तीची रक्कम थकवली आहे.

ठळक मुद्देशिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याने संस्थाचालकांची मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्र्यांकडे याबाबत तक्रारअसोसिएशनच्या प्रतिनिधींना राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बोलविलेल्या बैठकीमध्ये चर्चेसाठी बोलवावे

पुणे: जिल्ह्यातील नामांकित संस्थांच्या शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित असल्याने राज्याचे समाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे हे समाज कल्याण विभागाच्या अधिका-यांची बैठक घेणार आहे. मात्र, केवळ नामांकित महाविद्यालयांच्याच नाही तर इतरही लहान मोठ्या संस्थांच्या शिष्यवृत्तीबाबत चर्चा करावी,अशी मागणी महाराष्ट्र स्टेट अन-एडेड एज्युकेशनल इस्टिट्यूशनल असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.  सिंहगड इन्स्टिट्यूटला शिष्यवृत्तीची रक्कम मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. परंतु, केवळ समाज कल्याणने सिंहगड इन्स्टिट्यूटचेच नाही तर पुण्यातील अनेक शिक्षण संस्थांच्या शिष्यवृत्तीची रक्कम थकवली आहे. समाज कल्याण विभागाकडून शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याने काही संस्थाचालकांनी मुख्यमंत्र्यांकडे तर काहींनी सामाजिक न्याय मंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली. त्यामुळे मंत्रालयातून समाज कल्याण विभागाच्या अधिका-यांची चांगलीच कान उघडणी करण्यात आली. त्यानंतर अधिका-यांची धावाधावा सुरू झाली. मात्र,अजूनही अनेक संस्थांमधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित आहे.राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी येत्या २१ जून रोजी शासकीय विश्रामगृह येथे शिष्यवृत्तीच्या रक्कमेचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. त्यात पुण्यातील काही संस्थाचालकांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्याबाबत पत्रही देण्यात आले आहे. मात्र, त्यात काही ठराविक संस्थांचाच समावेश आहे.प्रामुख्याने विना अनुदानित महाविद्यालयांना शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.त्यामुळे केवळ नामांकित किवा अनुदानितच नाही तर विना अनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,अशी मागणी महाराष्ट्र स्टेट अन-एडेड एज्युकेशनल इस्टिट्यूशनल असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले,केवळ काही संस्थांच्याच शिष्यवृत्तीचा प्रश्न नाही तर राज्यात अनेक संस्थांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही.त्यामुळे असोसिएशनच्या प्रतिनिधींना राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बोलविलेल्या बैठकीमध्ये चर्चेसाठी बोलवावे,असे पत्र समाज कल्याण आयुक्तांना देण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDilip Kambleदिलीप कांबळेeducationशैक्षणिक