...त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस गप्प का बसले; गोपाळ तिवारी यांचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 09:24 PM2022-10-31T21:24:55+5:302022-10-31T21:25:17+5:30
गुजरातला प्रकल्प जात आहेत म्हणून खुश होत होते काय..? तिवारींचा उलट सवाल
पुणे : सगळेच प्रकल्प गुजरातला जाण्याचे श्रेय मविआ वर तारखेनीशी न्यायप्रविष्ट सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ढकलत असतील. तर मग तत्कालीन विरोधी पक्ष नेते म्हणून आपण मुग गिळून का गप्प होतात, असे सवाल काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे.
याबाबत गोपाळ तिवारी यांनी सांगितले की, आपल्या एका फोनवर बच्चु कडू गोहाटीस गेल्याचे कबुल केले. हा सर्व घटनाक्रम पहाता, ज्यांनी अपरात्री वेषांतर करुन राजकीय घरफोडी करुन मविआ सरकार पाडण्याचे काम केले. ते आज मात्र तथाकथित कागदपत्रे दाखवून जरी सर्व प्रकल्प गेल्याचे खापर मविआ सरकारवर फोडण्यात आपला पुरषार्थ सिध्द करण्याचा प्रयत्न करत असतील. तर मग हे सर्व जरी एकवेळ मान्य केले तरी तत्कालीन विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यावेळी कां गप्प होते..? का गुजरातला जात आहेत म्हणून खुश होत होते काय..? असा उलट सवाल काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.