शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Eknath Shinde: पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, पनवेलचे कर्मचारी का आले? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 6:14 PM

पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी आल्याने पुणे महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते

पुणे: पुण्यातील पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज पाहणी केली. त्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. सिंहगड  रोडच्या एकतानगरीतही शिंदेंनी भेट दिली. यावेळी त्यांनी पनवेल, ठाणे या भागातून कर्मचारी का पाठवले? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यात सिंहगड रोड भागात एकतानगरीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत पुणे महापालिकेच्या मदतीसाठी पनवेल, ठाणे, नवी मुंबईचे काही अधिकारी आणि कर्मचारी पाठवण्यात आले होते. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर एका महापालिकेवर खूप लोड येतो. चिपळूणला आलेल्या पुराच्या वेळीसुद्धा मी ठाणे, पनवेलच्या अधिकाऱ्यांना पाठवलं होत. त्याप्रमाणे पुण्यात पुराच्या वेळी  ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी पाठवले असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. 

पुण्याच्या सिंहगड रोड भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या घरातल्या वस्तू पाण्यात वाहून गेल्या. त्यांचा संसार रस्त्यावर आला. त्यावेळी प्रशासकीय यंत्रणेने तातडीने लोकांना मदतीचा हात देऊन पुरातून बाहेर काढले. आर्मीचे पुणेकरांसाठी धावून आले होते. त्याबरोबरच महापालिका अधिकारी, कर्मचारी, अग्निशमनचे जवान मैदानात उतरले होते. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आर्मी तातडीने धावून आली. तर ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारीही मदतीस आले होते. 

पुणे महापालिकेवर झाली होती टीका 

पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी आल्याने पुणे महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा पुणे महापालिकेवर टिका केली होती. पुण्यासारख्या मोठ्या शहरात दुसऱ्या महापालिकेचे अधिकारी बोलवावे लागतात हि लाजिरवाणी गोष्ट असल्याचे ते म्हणाले होते. तर विरोधकांनी सुद्धा बाहेरचे कर्मचारी का बोलवावे लागतात?  हा सवाल उपस्थित केला होता.   

रेस्क्यू ऑपरेशन अतिशय सुरळीतपणे झालं

पुण्यात पुर आला तेव्हा मी कंट्रोल रूम मधून पाहत होतो. त्यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, एनडीआरएफ, प्रशासन यंत्रणा शिवाय आर्मीच्या अधिकाऱ्यांना देखील सांगितलं कि, तुम्ही तात्काळ या सर्व पूरग्रस्तांच्या मदतीला जा. आपली फायर ब्रिगेडही इथे कार्यरत होती. इतर ठिकणी सर्व झाल्यावर आर्मी जाते. पण आपल्याकडे आर्मी सर्व प्रथम आली आणि आपल्याला मदतीचा हात दिला. रेस्क्यू ऑपरेशन अतिशय सुरळीतपणे झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीव वाचवण्याला प्राधान्य दिले गेले. असे एकनाथ शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधल्यानंतर सांगितलं.  

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीpanvelपनवेलthaneठाणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMuncipal Corporationनगर पालिका