शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Video : पुण्याकडे पक्षी का फिरवताय पाठ ? जाणून घ्या त्यामागचं नेमकं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 5:34 PM

शहर आणि परिसरात पक्ष्यांचा अधिवास असणारी अनेक ठिकाणे आहेत. परंतु, आता तिथेही पक्षी येणे कमी झाले आहे..

ठळक मुद्देपक्षी सप्ताहाला प्रारंभ : पक्ष्यांचे खाद्य नष्ट झाल्याने नदीकाठी त्यांची संख्या कमीनदीकाठच्या पक्ष्यांच्या अधिवासावर काँक्रिटीकरणाचे  ‘अतिक्रमण’

पुणे : दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या 'पक्षी सप्ताहा' ला यंदा सरकारकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे शहरात तर नदीकाठी पक्षी पाहायला जाण्याची खूप छान परंपरा आहे. मात्र हळूहळू ती लुप्तप्राय होताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी पुणेकरांच्या घरात हक्काने येऊन त्यांना सुरेल आवाजात साद घालणारी, आनंद पेरणारी, आपल्या इवल्या इवल्या चोचीने दाणे टिपणारी, नदी पात्रात मनसोक्त विहार करणारी वैविध्यपुर्ण पक्षी दैनंदिन जीवनाचा भाग होती. पण हल्ली मात्र चिमणीसह कुणीच नजरेला पडत नाही. काय कारण आहे नेमके पक्षांचं पुणेकरांवर रुसण्याचं.. त्याचा पक्षी सप्ताहाच्या निमित्त्ताने त्याचाच घेतलेला हा मागोवा..  

दरवर्षी ५ ते १२ नोव्हेंबर हा पक्षीसप्ताह म्हणून साजरा होतो. ५ नोव्हेंबर अरण्यऋषी साहित्यिक व पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन, तर १२ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्मदिन असतो. या दोघांच्याही कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने व लोकांमध्ये पक्षीविषयक जाणीव-जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेने २०१७ सप्ताह सुरू केला.  

पुणे शहरात आणि परिसरात पक्ष्यांचा अधिवास असणारी अनेक ठिकाणे आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. शहरात नदीकाठी पक्षी पाहायला जाण्याची परंपरा नष्ट झाली आहे. कारण सांडपाणी नदीत येत असल्याने त्यातील मासे आणि पाण वनस्पती नष्ट झाल्या. त्यावर जगणारे पक्षीही येणे बंद झाले आहे. मुठा नदीकाठी सिमेंटचे कठडे असल्याने पाणथळ जागाच नष्ट झाल्या आहेत. परिणामी पक्ष्यांचे खाद्य कमी होत असल्याने त्यांचे येणेही दुर्मीळ होत आहे.

पक्षी सप्ताह कशासाठी ?पक्षी प्रजातींच्या संकटग्रस्त यादीत दिवसेंदिवस भरच पडत आहे. हे थांबवायचे असेल तर नागरिकांमध्ये पक्ष्यांविषयी प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हायला हवा. त्यासाठीच हा पक्षी सप्ताह आवश्यक आहे. लहान मुलांना पक्षी निरीक्षणासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. तेच भविष्यात पक्ष्यांसाठी चांगले कार्य करू शकतील.

नदीकाठी पक्षी येणे बंदचनदीला सिमेंटचे काठ आल्याने तिथली परिसंस्था नष्ट झाली. शहरातील नदीची अशीच अवस्था आहे. पण खडकवासला ते विठ्ठलवाडी या परिसरातील काठावर सिमेंटीकरण झालेले नाही. तिथे काही प्रमाणात पक्षी दिसतात. पण विठ्ठलवाडीपासून पुढे शहरात पक्ष्यांसाठी जागाच नाही.  

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण