पुणे : मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात आज शांतता रॅली सुरु आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून हजारो मराठा बांधव पुण्यनगरीत दाखल झाले आहेत. सारसबागेतून या रॅलीला सुरुवात होणार असून डेक्कनला समारोप होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून रॅली जाणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून प्रमुख रस्त्यांची वाहतूक बदलून पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. त्यामुळे बऱ्याच प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. ज्या रस्त्यावरून जरांगे पाटील यांची रॅली जाणार आहे. त्या बाजीराव रस्त्यावर एका पुणेकरानेआमदार आणि त्याच्या चालकाला सायरनवरून सुनावाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे पुण्यातील बाजीराव रस्त्याने जात होते. गाडी चालवणाऱ्या चालकाने सायरन वाजवला. यावेळी एका पुणेकराने या चालकाला सायरन का वाजवतोस म्हणून जाब विचारला. त्या गाडीत होते आमदार किशोर दराडे. त्यानंतर या पुणेकराने चालकासह आमदारालाही असा काही जाब विचारला की दोघांचीही बोलतीच बंद झाली आहे. आमदारही त्या पुणेकरासमोर निरुत्तर झाले आहेत.
काय म्हणाला पुणेकर...!
कारे बाबा का लावतो सीट बेल्ट.., विदाउट सिल्ट बेल्ट चालवत होत ना तू गाडी, सायरन वाजवतो होय. आमदार बसलेत तर सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली. पोलिसांकडे नको बघू, आम्ही जनता आहोत. आम्ही आमदारांना निवडून देतो तेव्हा ते निवडून येतात. सायरन वाजवायला परवानगी कोणी दिली? सिल्ट बेल्ट कुठंय आता घालतोय का तू? असा सवाल उपस्थित करत या पुणेकराने आमदारासोबत चालकाला चांगलच सुनावलं आहे.