शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
2
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
4
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
5
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
6
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
7
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
8
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
9
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
10
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
11
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
12
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
13
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
14
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
15
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
16
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
17
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
18
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
19
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
20
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

पती-पत्नीच्या सुंदर नात्यात हिंसा का वाढतेय?

By नम्रता फडणीस | Updated: December 4, 2024 10:27 IST

गेल्या काही वर्षांत घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे : पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले आणि त्याचा राग पत्नीला आला. त्यानंतर तिने चक्क पतीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. लाटणे, मिक्सरच्या भांड्याने मारहाण केली, नखांनी जोरात ओरखडले, पतीच्या उजव्या हाताच्या करंगळीला चावा घेऊन दुखापत केली. अखेर पतीला पोलिसांकडे धाव घ्यावी लागली आणि समर्थ पोलिस स्टेशनमध्ये पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही रविवारी (दि. १) घडलेली ताजी घटना आहे.

गेल्या काही वर्षांत घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत असून, किरकोळ कारणांवरून पती-पत्नींमध्ये होणारे वाद इतके विकोपाला जात आहेत की याचे पर्यवसान हाणामारी आणि अगदी खून करण्यामध्ये होत आहे. ही नात्यातील वाढती हिंसा एक चिंतेची बाब बनली असून, पती-पत्नीच्या सुंदर नात्यात इतकी हिंसकता येतेच कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एक काळ असा होता की, पुरुषी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी किंवा स्वत:चे नैराश्य, अपयश लपविण्यासाठी पती आपल्या पत्नीवर हात उगारत असे. दुर्दैव म्हणजे कुटुंबातील सदस्यांना यात वावगे काहीच वाटत नव्हते. कुणी पुरुषाला अडविण्याचा प्रयत्नही करीत नव्हता. अजूनही ही स्थिती फारशी बदललेली नाही. मात्र, आता एकविसाव्या शतकात सबला पत्नीकडूनदेखील क्षुल्लक कारणावरून मागचापुढचा विचार न करता पतीला शिवीगाळ करणे, मारहाण करणे, विवाहबाह्य संबंधातून खून करणे असे प्रकार वाढत आहेत.

दोन वर्षांपूर्वी पती गिफ्ट देत नाही, फिरायला नेत नाही म्हणून पत्नीने पतीच्या नाकावर ठोसा मारून त्याला घायाळ केल्याची घटना गाजली होती. दोन दिवसांपूर्वीच उत्तमनगरमध्ये पत्नीने न सांगता रिक्षाचे हप्ते भरले म्हणून पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली. त्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांनी एकमेकांसमवेत आयुष्य घालविण्याची स्वप्न रंगवली तेच एकमेकांना दुखापत करायलादेखील मागेपुढे पाहत नाहीत, ही नात्यासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. यावर विचारमंथन होण्याची गरज आहे. अन्यथा विवाह संस्था मोडकळीस येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

लग्न, संसार म्हणजे काय? याच गोष्टी आता पती-पत्नी विसरत चालले आहेत. मी, माझं आणि मला इतकंच त्यांचं नातं व्यावहारिक झालं आहे. मोबाइलमुळे निर्माण झालेल्या विसंवादाचा परिणाम लहान मुलांना भोगावा लागत आहे. पूर्वी कुटुंबातील सदस्य एकत्रित बसून चहा पित असत. आता चहा पितानाही हातात मोबाइल असतो अशी स्थिती आहे. पती-पत्नीमध्ये भावनिकता राहिलेली नाही. - संगीता जाधव, पोलिस निरीक्षक, भरोसा सेलअनेकदा पती-पत्नीच्या नात्यात संवादाचा अभाव, विश्वासाचा तुटलेला धागा आणि ताणतणाव यामुळे टोकाच्या घटना घडतात. त्यामागे मानसिक ताण, चिडचिड, किंवा नैराश्य यांचा मोठा वाटा असतो. "बायका पुरुषांना मारत नाहीत" हे सार्वकालिक सत्य मानणे चुकीचे आहे, कारण काही विशिष्ट परिस्थितींमध्ये महिलाही आक्रमक होऊ शकतात. भारतात महिलांसाठी अनेक संरक्षणात्मक कायदे आहेत, जसे घटनेतील कलम 498 अ (कौटुंबिक हिंसेविरुद्ध संरक्षण); परंतु पुरुषांसाठी अशा प्रकारच्या संरक्षणात्मक तरतुदी फारशा उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात महिलांकडून असे प्रकार घडतात - ॲड. राणी माणिक सोनावणे, उच्च न्यायालय नियुक्त मध्यस्थ आणि चेअरमन, पुणे लाॅयर्स कन्झ्युमर सोसायटी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFamilyपरिवारCourtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदार